कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय स्थगित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय स्थगित

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी कौन्सिलने कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय शुक्रवारी मागे घेत

लातूरमध्ये होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती
लसीकरणामुळे कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येतो-डॉ.शरद कोठुळे
पंतप्रधान मोदींनी घेतली झेलेन्स्की यांची गळाभेट

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी कौन्सिलने कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय शुक्रवारी मागे घेतला आहे. जीएसटी कौन्सिलने यापूर्वी कपड्यांवरील जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 7 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक राज्ये आणि वस्त्रोद्योग संघटना हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत होते.
जीएसटी परिषदेच्या 17 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय या बैठकीत स्थगित केला आहे. यामुळे फेब्रुवारी 2022 पर्यंत कपड्यांवरील 5 ते 12 टक्क्यांची जीएसटी दरवाढ पुढे ढकलली आहे. मात्र, दुसरीकडे चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार आहे.
सद्यस्थितीत देशात मानवनिर्मित फायबरवर 18 टक्के जीएसटी दर आहे. एमएमएफ यार्नवर 12 टक्के आणि कपड्यांवर 5 टक्के जीएसटी दर आहे. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या मागील जीएसटी बैठकीत कपडे आणि चप्पल बुटांच्या जीएसटी दराच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. जीएसटी परिषदेच्या बैठकीत तामिळनाडू, पश्‍चिम बंगालसह अनेक राज्यांनी कपडे आणि चप्पल बुटांवर जीएसटी वाढीच्या निर्णयाला विरोध केला. यामुळे अखेर केंद्रीय अर्थमंत्र्यांना कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय फेब्रुवारी 2022 पर्यंत स्थगित करावा लागला. असं असलं तरी चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढ अद्याप कायम आहे. त्यामुळे याचा परिणाम नव्या वर्षात चप्पल बुटांच्या किमतीवर पाहायला मिळणार आहे. सद्यस्थितीत देशात मानवनिर्मित फायबरवर 18 टक्के जीएसटी दर आहे. एमएमएफ यार्नवर 12 टक्के आणि कपड्यांवर 5 टक्के जीएसटी दर आहे. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या मागील जीएसटी बैठकीत कपडे आणि चप्पल बुटांच्या जीएसटी दराच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. जीएसटी परिषदेच्या बैठकीत 1 जानेवारी 2022 पासून सर्व फुटवेअरवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर सर्व किमतीच्या वस्तूंसाठी सारखाच असेल. त्यामुळे तुमची चप्पल अथवा बूट 100 रुपयांचे असो की एक हजार रुपयांचे त्या सर्वांवर 12 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. चप्पल बुटांचा जीएसटी दर कमी करण्यावर पुढील बैठकीत निर्णय होणार आहे.

नव्या वर्षांपासून चप्पल-बुट महागणार
जीएसटी परिषदेच्या बैठकीत 1 जानेवारी 2022 पासून सर्व फुटवेअरवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर सर्व किमतीच्या वस्तूंसाठी सारखाच असेल. त्यामुळे तुमची चप्पल अथवा बूट 100 रुपयांचे असो की 1000 रुपयांचे त्या सर्वांवर 12 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. चप्पल बुटांचा जीएसटी दर कमी करण्यावर पुढील बैठकीत निर्णय होईल असेही सांगण्यात आले आहे.

COMMENTS