नाशिक - नाशिक शासनाचे पदोन्नतीचे धोरण व निर्देशानुसार नाशिक जिल्हा परिषदेत दिनांक 4 डिसेंबर २०२३ रोजी विभागीय पदोन्नती समितीच्या समितीची बैठ
नाशिक – नाशिक शासनाचे पदोन्नतीचे धोरण व निर्देशानुसार नाशिक जिल्हा परिषदेत दिनांक 4 डिसेंबर २०२३ रोजी विभागीय पदोन्नती समितीच्या समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अनुषंगाने एकूण १४ कनिष्ठ सहाय्यक यांना आज दिनांक 22 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने वरिष्ठ सहायक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली व दि. 22 रोजी आदेश निर्गमित करण्यात आली.
शासन निर्णय दिनांक एक ऑगस्ट 2019 नुसार दि. 4 डिसेंबर २०२३ रोजी विभागीय पदोन्नती समितीची बैठक ही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, सहायक गट विकास अधिकारी प्रशांत पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद मुख्यालय व सर्व पंचायत समिती मिळून एकूण २४ पदांकरिता ४० प्रस्ताव मागवण्यात येऊन पडताळणी करण्यात आली, त्यापैकी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी रिक्त असलेल्या १३ व ऑक्टोबर महिन्यात रिक्त झालेल्या १ अशा १४ पदांवर पदस्थापना करण्यात आली. तसेच ऑगस्ट २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांवर निवडसूचितील प्रतीक्षित कनिष्ठ सहायक यांना पदोन्नती देण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागामार्फत राबवण्यात आलेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये मुख्यालयात ५ तर तालुकास्तरावर ९ रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात आल्या. यामध्ये चांदवड, सुरगाणा, नाशिक, पेठ, इगतपुरी, सिन्नर, येवला, कळवण या आठ तालुक्यांमध्ये पदस्थापना देण्यात आल्या. पदोन्नतीस पात्र कनिष्ठ सहायक हेमराज बागूल, यांनी पदोन्नती नाकारल्याने प्रतीक्षा सूचितील कनिष्ठ सहायक यांची पदोन्नतीसाठी निवड करण्यात आली. बागूल यांनी पदोन्नती नाकारल्याने दि. १ जानेवारी २०१६ पासून त्यांना मिळणारे वरिष्ठ सहायक पदाचे लाभ हे काढून घेण्याचे निर्देश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
या पदोन्नती प्रक्रियेत जिल्हा मुख्यालयातील सर्व विभागप्रमुख, सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांचेकडून प्रस्ताव सादर करण्यात आले. यानंतर सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहायक भास्कर कुवर, कानिफनाथ फडोळ, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनाली भार्गवे, निवृत्ती बगड, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री, वित्त विभागातील सहायक लेखाधिकारी शाम कांबळे, लेखाधिकारी रमेश जोंधळे यांनी परिश्रम घेतले. पदोन्नती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर पदोन्नतीने रिक्त झालेल्या व होणाऱ्या पदांवर परिचर या संवर्गातून एक महिन्याच्या आत कनिष्ठ सहायक या पदावर पदोन्नतीची प्रक्रिया करावी असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले.
अशी देण्यात आली पदस्थापना –
सरोज बागूल (मुख्यालय, शिक्षण विभाग – प्राथमिक)
साहेबराव जमधडे, (पंचायत समिती चांदवड),
विश्वजित पाटील(मुख्यालय मनरेगा कक्ष)
अरुण भोये (पंचायत समिती नाशिक)
युवराज राऊत (पंचायत समिती सुरगाणा)
लता उदार (मुख्यालय – कृषि विभाग)
वंदना हरणे (मुख्यालय – सामान्य प्रशासन विभाग)
तारचंद राऊत (पंचायत समिती पेठ)
योगेश घाणे (पंचायत समिती चांदवड)
दिनेश टोपले (पंचायत समिती इगतपुरी)
नामदेव गोडे (पंचायत समिती सिन्नर)
विश्वास कचरे (पंचायत समिती येवला)
संजय गवळी (पंचायत समिती कळवण)
मनीषा हडप (मुख्यालय – सामान्य प्रशासन विभाग)
COMMENTS