Homeताज्या बातम्यामनोरंजन

लोकप्रिय अभिनेत्री श्रीजिता डे लवकरच अडकणार लग्नबंधनात

मुंबई प्रतिनिधी - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया

संगमनेरमध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन
जागतिक हिवताप दिन व जागतिक मलेरिया दिन येथील उपकेंद्र झाला संपन्न
अ‍ॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री ; गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री, ‘बिग बॉस 16’ फेम श्रीजिता डे लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. श्रीजिताने स्वत:चं लग्नसोहळ्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. अनेक दिवसांपासून ती जर्मनमध्ये राहणाऱ्या मायकल ब्लोम पेपला डेट करत आहे. श्रीजिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्रीजिता म्हणत आहे की, माझा वेडिंग गाऊन तयार असून येत्या 1 जुलैला मी लग्न करणार आहे”. श्रीजिताच्या लग्नसोहळ्याच्या घोषणेने चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते श्रीजिताला शुभेच्छा देत आहेत.

COMMENTS