रवळगाव मध्ये रस्त्याची कामे निकृष्ट संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Homeताज्या बातम्याअहमदनगर

रवळगाव मध्ये रस्त्याची कामे निकृष्ट संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

 कर्जत तालुक्यातील रवळगाव  या गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेले पानंद रस्ते व पंधराव्या वित्त आयोगांमधून करण्यात आलेली सिमेंटची रोड

संजीवनीच्या विद्यार्थ्यांची लायन्स मूकबधिर विद्यालयास भेट
अहमदनगर जिल्ह्यात नव्या ३७८० बाधितांची रुग्ण संख्येत भर
वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी

 कर्जत तालुक्यातील रवळगाव  या गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेले पानंद रस्ते व पंधराव्या वित्त आयोगांमधून करण्यात आलेली सिमेंटची रोड यासह सर्वच कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत. तरी या सर्व कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन गटविकास अधिकारी कर्जत यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर  डॉक्टर अक्षय मोहन खेडकर, भाग्येश बिबीशन खेडकर, विशाल दिलीप खेडकर, सोमनाथ सत्यवान झांबरे,जालिंदर गोरख खेडकर, राहुल सुरेश खेडकर,मल्हारी मच्छिंद्र खेडकर, संकेत संदीप खेडकर त्यांची नावे आहेत.

 कर्जत तालुक्यातील रवळगाव या गावामध्ये वायळवस्ती रोड, गावठाण सिमेंट काँक्रीट रोड,यासह  रोजगार हमी योजनेअंतर्गत पानंद रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. पंधरावे वित्त आयोग या ग्रामपंचायतीच्या निधीमधून सिमेंट रोड व इतरही काही कामे गावामध्ये करण्यात आली आहे. मात्र ही सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. हे पानंद रस्ते, सिमेंट रस्ते  करताना निवेदे प्रमाणे काम करण्यात आलेले नाहीत.

अनेक रस्त्यांची असणारी लांबी रुंदी त्याचा दर्जा वापरण्यात आलेले सर्व मटेरियल यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते. आलेख रस्ते काम झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच खराब झाले आहेत. गावातील एका प्रभागामध्ये तर सुरुवातीला सिमेंटचा रस्ता करण्यात आला आहे. आणि यानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर गटारीचे काम करण्यासाठी संपूर्ण रस्ता खोदण्यात आला आहे यामुळे तो रस्ता व केलेले सर्व काम आणि पैसे वाया गेले आहेत.

 या सर्व कामांची चौकशी व्हावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत तसेच अंदाजपत्रकानुसार जोपर्यंत रस्त्यांची सर्व कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने बिल देऊ नये. तसे न झाल्यास जिल्हा परिषद अहमदनगर व कर्जत पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर सर्व ग्रामस्थ उपोषण करून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS