नवी दिल्ली : निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
नवी दिल्ली : निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तसेच 26 सप्टेंबरपर्यंत पूजाला अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी झाली. न्यायालयात बुधवारीच दिल्ली पोलिसांनी स्टेटस रिपोर्ट सादर केला होता. पूजाचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पण यूपीएससीने केलेल्या आरोपांत तथ्य नाही असे सांगत पूजाने सर्व आरोप फेटाळून लावले होते. पूजा खेडकर प्रकरणी गुरूवारी सुनावणीत दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. पूजा खेडकरने दाखल केलेले प्रमाणपत्र खोटे असल्याचे सांगण्यात आले. अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलने दिलेले ते प्रमाणपत्र नाही, असे दिल्ली पोलिसांच्या वतीने वकिलांनी सांगितले. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने 10 दिवसांत सविस्तर तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
COMMENTS