नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी आणि बडतर्फ केलेली आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. त्य

नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी आणि बडतर्फ केलेली आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. त्यामुळे 17 मार्चपर्यंत पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा मिळाला आहे. पूजा खेडकर यांनी 2022 च्या यूपीएससी अर्थातकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बनावट दिव्यांग कागदपत्रे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळणार्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उत्तर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आणखी वेळ दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही खेडकर यांनीही तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे.
COMMENTS