Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 27 फेबु्रवारीला मतदान

कसबापेठ आणि पिपरी चिंचवड मतदारसंघाचा समावेश

मुंबई : कसबा पेठ येथील आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आह

संघटन, समर्पण व सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार : पंतप्रधान मोदी
कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश ; 42 जणांचा मृत्यू
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – ना. बाळासाहेब थोरात

मुंबई : कसबा पेठ येथील आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन विधानसभा निवडणुकांच्या जागासाठी ही पोटनिवडणूक होणार असून, यासाठी उमेदवारांना 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
पुण्यातील कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या जागा रिक्त होत्या. आता या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणूकीसाठीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारी अर्जांची छाननी तर 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होईल. दरम्यान, या दोन्हीही जागांवर महाविकासआघाडी आपले उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील सत्तासंघर्षानंतर ही दुसरी पोटनिवडणूक आहे. यापूर्वी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, अखेरीस शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या होत्या.

COMMENTS