धुळे प्रतिनिधी - धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आ
धुळे प्रतिनिधी – धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. सकाळपासून मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्या असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 16 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोंडाईचा आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून 252 उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित 16 जागांसाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जय किसान आणि परिवर्तन पॅनल मध्ये लढत होणार आहे. या ठिकाणी आमदार जयकुमार रावल आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यात मुख्य लढत असून आज धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या असून उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून या मतदान केंद्रावर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील लक्ष ठेवून आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात मतदान केंद्र असून या ठिकाणी ही मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे, 64 कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आले असून 3590 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून तीस तारखेला या मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यामुळे या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या पॅनल ला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
COMMENTS