Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात एकाधिकारशाहीचे राजकारण सुरू ः ज्ञानदेव वाफारे

पाथर्डी/प्रतिनिधी ः दीडशे वर्षाची इंग्रजाची जुलमी राजवट महात्मा गांधी यांनी कोणत्याही शस्त्राने, विना सत्याग्रहाच्या माध्यमातून मोडीस काढली. सत्य

स्वस्त धान्य दुकानदाराचा इतरत्र लंपास होत असलेला माल पकडला
सोनईत सलग चौथ्या दिवशीही पाऊस
2.15 कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता ः आ. आशुतोष काळे

पाथर्डी/प्रतिनिधी ः दीडशे वर्षाची इंग्रजाची जुलमी राजवट महात्मा गांधी यांनी कोणत्याही शस्त्राने, विना सत्याग्रहाच्या माध्यमातून मोडीस काढली. सत्याग्रहाने स्वातंत्र्य मिळालेला जगाच्या पाठीवर एकमेव देश भारत आहे. त्याच अनुषंगाने हे नवे जय भारत सत्याग्रहआंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने एक महिना चालणार असून हे दुसरे स्वातंत्र्य युद्ध म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शासकीय विश्रामगृह पाथर्डी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात येणार्‍या जय भारत सत्याग्रह आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष नासिर शहानवाज शेख,किशोर डांगे,जालिंदर काटे,गणेश दिनकर,अनिल साबळे, जुनेद पठाण,नवाब शेख,पापाभाई तांबोळी मुन्नाभाई खलिफा, इजाज पठाण, सुभाष कोलते, असलम सय्यद संजय कराड, ज्ञानेश्‍वर भाबड, रामचंद्र ढोले, आकाश काळोखे, प्रशांत कोठे, बाळू चितळे, शाहिद पठाण, युसुफ खान, मोहम्मद शेख, आनंद सानप, दत्ता पाठक, धनराज घोडके,महेश दौंड आदी जण उपस्थित होते. पुढे बोलताना वाफारे यांनी म्हटले की, सत्तेतील सरकारची काम करण्याची कार्यपद्धती जनतेच्या शेवटच्या माणसापर्यत मांडायची असेल तर अभिनव आंदोलन संगटनेच्या माध्यमातून केले पाहिजे ही भूमिका घेऊन तसेच सध्या पक्षाचे नाही तर एकाधिकारशाही राजकारण चालू आहे.एका बाजूने एकाधिकारशाही यायला जरी सुरवात होऊन ती कब्जा मिळवत असेल तर जनआंदोलन उभं करण्यासाठी जय भारत सत्याग्रह आंदोलन एफ्रिल  काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सुरू करत आहोत. पक्षाच्या वतीने गावपातळीवर घोगडी बैठकीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचे काम केले जाणार आहे.राहुल गांधींवर अन्याय झाला ही आमची भूमिका नसून देशातील अनेक लोकांवर अन्याय होत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न, महागाई, बेरोजगारी यावर भूमिका घेऊन लोकांपर्यत जाण्याचे काम पक्षाच्या वतीने करणार आहोत.गावपातळीवर जय भारत सत्याग्रह आंदोलन संपल्यानंतर त्यावर विचारमंथन करण्यासाठी जिल्हापातळीवर कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असून यामध्ये समविचारी पक्षाना सोबत घेणार आहोत. हे आंदोलन कोणत्याही पक्षविरोधी नसून एका प्रवृती विरुद्ध आहे.आमचा सत्याग्रह एकाधिकारशाही विरुद्ध आहे.प्रास्ताविक नासिर शेख यांनी तर आभार किशोर डांगे मानले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी पाथर्डी तालुक्यात पक्षाची धुरा सांभाळत पक्षाचे संघटन करणार्‍या तालुकाध्यक्ष नासिर शहानवाज शेख व त्यांच्या सहकार्‍यांचे विशेष कौतूक केले.

COMMENTS