विकासापेक्षा धर्माच्या नावावर होणारे राजकारण दुर्देवी – नामदार थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासापेक्षा धर्माच्या नावावर होणारे राजकारण दुर्देवी – नामदार थोरात

संगमनेर/प्रतिनिधी।१५महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अनेक विकास कामांना मोठी गती दिली आहे. आपल्या भागाला वरदान ठरणाऱ्

तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला ः जिल्हाधिकारी सालीमठ
कृषीकन्या विशाखा उघडे हिने साधला शेतकऱ्यांशी संवाद
नागपुरात आढळला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण

संगमनेर/प्रतिनिधी।१५महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अनेक विकास कामांना मोठी गती दिली आहे. आपल्या भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडेच्या कालव्यांची कामे रात्रंदिवस अत्यंत वेगाने सुरू असून येत्या ऑक्टोबर मध्ये डाव्या व उजव्या दोन्ही कालव्याद्वारे पाणी आणण्यासाठी काम होत आहे. तालुक्यात सर्वांना समान संधी देत विकासाची घोडदौड कायम असून देशात सध्या जाती-धर्माच्या नावावर होणारी राजकारण  दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
वडगाव पान येथे भीम प्रतिष्ठान च्या वतीने संविधान स्तंभाचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते. तर व्यासपीठावर सौ दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, सुनंदाताई जोर्वेकर, नवनाथ आरगडे ,जि. प .सदस्य महेंद्र गोडगे, पंचायत समिती सदस्य सौ बेबीताई थोरात, सुभाष सांगळे, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड ,सरपंच श्रीनाथ थोरात, पद्माताई थोरात, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश थोरात, गौरव डोंगरे बाळू फकीरा गायकवाड, आदित्य गायकवाड, सागर गायकवाड, सुनील गायकवाड, जनार्दन गायकवाड, अन्वर तांबोळी, रावसाहेब जंबुकर,   आदी उपस्थित होते.यावेळी वडगाव पान – जोर्वे, काशीद वस्ती या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, समाजातील अघोरी परंपरा विरुद्ध सर्वप्रथम भगवान बुद्धांनी आवाज उठवला. समतेच्या या  परंपरेचा प्रसार विविध संतांनी केला. या समानतेच्या तत्वांना एकत्र आणण्याचे काम राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी जगाला सर्वात मोठी लोकशाही दिली असून समतेच्या अधिकारामुळे गरीब श्रीमंती असा भेद लोकशाहीत नाही. भारतीय लोकशाही ही आपल्या सर्वांची ताकद आहे .मात्र सध्या देशामध्ये धर्माच्या नावावर राजकारण होत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. जातीपातीचे राजकारण करून मनभेद निर्माण केले जात आहे. या विरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन मानवता या धर्मासाठी काम केले पाहिजे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर निळवंडे कालव्यांचे कामे अत्यंत वेगाने सुरू झाली आहेत. डाव्या व उजव्या कालव्याद्वारे ऑक्टोबर २०२२ मध्ये पाणी आणण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न आहेत. याचबरोबर संगमनेर तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. येथील राजकारण, समाजकारण, सुसंस्कृतपणा संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत आहेत. सर्व समाजाला प्रतिनिधित्व देत एक चांगले वातावरण तालुक्यात सदैव आहे. परंतु येथील प्रगती व विकास काहींना अस्वस्थ करतो अशा अस्वस्थ प्रवृत्ती कडे लक्ष देऊ नका. असे सांगताना आगामी काळामध्ये सर्वांनी विकासाच्या पाठीशी उभे रहा असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, पंचायत समिती सदस्या सौ.बेबीताई थोरात, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी अशोकराव थोरात ,शेखर ओहोळ, कैलास गायकवाड ,अशोक गायकवाड गोरक्षनाथ गायकवाड, दत्तू थोरात, सुनील थोरात ,सौ रुपाली थोरात, सुनील गायकवाड ,निलेश थोरात, अंकुश काशीद, बजरंग थोरात, ऋतिक राऊत, डॉ. दादाभाऊ थोरात, महेश मोरे, राजू गायकवाड ,रमेश गायकवाड, बाबासाहेब गायकवाड ,मनोहर गायकवाड, उत्तम गायकवाड ,सोमनाथ आव्हाड, जगन्नाथ गायकवाड, सुधाकर वाघमारे, गणेश गडगे, बाळासाहेब गडगे, शाहीर गायकवाड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत उपसरपंच सोमनाथ गायकवाड यांनी केले प्रास्ताविक बाळासाहेब गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार प्रदर्शन भालचंद्र गायकवाड यांनी केले.

COMMENTS