Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय चिखलफेक

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी महाराष्ट्राचे राजकारण एक

आतातरी आरक्षणाचा प्रश्‍न सुटेल का ?
आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे आणि उपाय योजना
संसदेतील गोंधळ

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी महाराष्ट्राचे राजकारण एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यात गुंतल्याचे दिसून येत आहे. दसरा मेळावा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे. दादरच्या शिवाजी पार्कवर दिवगंत बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायचे, त्यांना एक राजकीय संदेश द्यायचे. मात्र आजमितीस महाराष्ट्रात होणारे दसरा मेळावे केवळ राजकीय चिखलफेक करण्यासाठीच होत असल्याचे दिसून येत आहे. एकमेकांचा समाचार घ्यायचा आणि आपणच कसे मोठे आहोत हेच त्यातून सिद्ध करायचे असाच हा कार्यक्रम असल्याचे दिसून येत आहे. दसरा मेळाव्यातून विचारांचे सोने लुटायचे, नवा विचार द्यायचा, महाराष्ट्राच्या हिताच्या दोन कानमंत्र देणे या बाबी आता इतिहासजमा होतांना दिसून येत आहे. दसरा मेळावा म्हटला की, राजकीय चेखलफेकीचा मेळावचा होतांना दिसून येत आहे. गेल्या काही दशकांपूर्वी महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्याच पठडीतील होते. होते हा शब्द यासाठी हा महाराष्ट्राचे सुसंस्कृत राजकारण आता लयाला जातांना दिसून येत आहे. आणि आगामी काही वर्षे तरी हा सुसंस्कृतपणा, बघायला मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून ते आजपर्यंतच्या कार्यकाळाचा आढावा घेतला तर, 2000 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलतांना दिसून येतो. आणि आजमितीस त्या राजकारणाचा शेवट होतांना दिसून येतो. एकेकाळी बिहारमध्ये, उत्तरप्रदेशमध्ये जसे राजकारण, निवडणुका बघायला मिळायचे, त्याची आवृत्ती आपल्याला आजमितीस बघायला मिळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलतांना दिसून येत आहे. बदल हा नैसर्गिक स्वभाव असला तरी, हा बदल पुढे घेवून जाणारा नसून, मागे नेणारा आहे. हा बदल महाराष्ट्राची पीछेहाट होणारा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रदीर्घ असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत देखील महाराष्ट्राने आणि पश्‍चिम बंगालने देशाला दिशा दिली. कारण स्वातंत्र्य भारताच्या अगोदरपासून या दोन राज्यात प्रबोधनाची मोठी चळवळ सुरू होती. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, न्या. रानडे, आगरकर, टिळक यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक दिशा दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यामुळे या दशकांत होणारी राजकीय चिखलफेक अशी नव्हती. किंवा त्याकाळचे राजकीय नेते सकाळीच पत्रकार परिषदा घेण्याचा सपाटा लावत नव्हते. मात्र अलीकडे होणारी चिखलफेक ही भयावह असून, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलतांना दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा सर्वांनाच विसर पडला असून, त्यातून खुनशी राजकारण वाढत चालले आहे. वचपा काढण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर, भाषणावेळी, पत्रकार परिषदांमध्ये सोडली जाणारी पातळी, या सर्वच बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. यावर खरंच विचारमंथन होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मोठ्या उंचीचे नेते आहेत. तरी देखील या नेत्यांनी आपली उंची सोडून वक्तव्ये करणे सुरू केली आहेत. त्यामुळे राजकारणाची ही कूस एका वेगळ्याच राजकारणाला जन्म देतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील अशांततेचे राजकारण असेच सुरू राहिले, तर महाराष्ट्राची पुरती पीछेहाट होण्यास वेळ लागणार नाही. महाराष्ट्राची भूमी ही फुले, शाहू, आणि आंबेडकरांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत लोकशाहीचे समतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी विचार रूजवण्यासाठी या राज्यातील लोकप्रतिनिधींनी सर्वंकष चळवळ उभारण्यासाठी, या चळवळीला पुढे घेवून जाण्यासाठी आजच्या लोकप्रतिनिधींनी हातभार लावण्याची गरज होती. पण समकालीन लोकप्रतिनिधी, स्टंटबाजी-आरडाओरडा करण्यात भूलथापा मारण्यात ही मंडळी धन्यता मानतांना दिसून येत आहे. दसर्‍या मेळाव्यात देखील हेच दिसून येत आहे. एकमेकांचा समाचार घ्यायचा, त्याला शिव्या दे, आपणच कसे श्रेष्ठ आहोत याचे डोस देण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS