विरोधासाठी व्यापार्‍यासह राजकिय नेते लक्ष्य

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विरोधासाठी व्यापार्‍यासह राजकिय नेते लक्ष्य

सुमारे वर्षभरापासून ईडी च्या कारवाईच्या धसक्याने राजकारण्यांसह राजकारण्यांच्या नातेवाईकांचे व्यावसाय लक्ष्य झाल्याचे पहावयास मिळत आहे. जिएसटीसह इतर क

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर
नया पाकिस्तान
अर्थव्यवस्थेच्या नाड्या आणि हिंडनबर्ग

सुमारे वर्षभरापासून ईडी च्या कारवाईच्या धसक्याने राजकारण्यांसह राजकारण्यांच्या नातेवाईकांचे व्यावसाय लक्ष्य झाल्याचे पहावयास मिळत आहे. जिएसटीसह इतर कराच्या नव्या रचनेनंतर कोरोनाने डोके वर काढल्यामुळे सर्व व्यापार जगत कोलमडले होते. त्यातच राजकिय हेवे-दावे वाढत गेले. सत्तासंघर्षासाठी कोणीही कोणा विरोधात तक्रार देण्याचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. याचा गैरफायदा नेहमीच सत्ताधारी घेत असल्याचे आपणास आणिबाणीच्या काळापासून पहावयास मिळत आहे. त्यातच राजकिय नेता व्हायचे असेल तर आता तत्वे, बुध्दीमत्ता, वैचारीकता, संयम या गोष्टी पूर्वी असाव्या लागत होत्या. मात्र, आता हार्ड अ‍ॅण्ड फास्ट लिडरशिप मिळविण्यासाठी सर्व बाबींना तिलांजली देऊन सत्तेसाठी पैसा उभा करण्याकडे लक्ष असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे एखाद्याला नमवण्यासाठी सरकारी यंत्रणा कशी कामाला लावायची याचा काही लोकांनी चांगला अभ्यास केला असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामध्ये विरोधकास नामोहरण करण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्याकडे लक्ष्य असल्याचे आपणास पहावयास मिळत आहे.
गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या चर्चेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीने गोव्यात बेकायदेशीरित्या बार चालवला असल्याचा आरोप होत आहे. हा बार सुरु करण्यासाठी स्मृती इराणी यांच्या मुलीने बनावट परवान्याचा वापर केला असल्याची माहिती माहितीच्या आधिकारातून समोर आली असल्याचे काँग्रेसचे जनसंपर्कप्रमुख पवन खेरा यांनी दिली. हा आरोप करतानाच विरोधी पक्षाने स्मृती इराणी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीने सिली सोल्स कॅफे अ‍ॅण्ड बार हा बार सुरु करण्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन परवाना मिळवला. 22 जून 2022 रोजी अँथनी डीमागा यांच्या नावाने परवाना नूतनीकरणासाठी अर्ज आला होता. मात्र, अँथनी यांचा मृत्यू मागील वर्षी झाला आहे. अँथनी मुंबईमधील विर्लेपार्ले या परिसरातील रहिवाशी आहेत. त्यांचे मृत्युपत्रदेखील मिळाले आहे, असल्याचा गौप्यस्फोअ खेरा यांनी केला आहे. पीएनबी घोटाळ्यातील फरार झालेला हिरे व्यापारी आरोपी निरव मोदी याची 253.62 कोटी रुपयांची संपत्ती मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने नव्याने जप्त केली. यामध्ये काही मालमत्ता, हीरे, दागिने, बँक बॅलन्सचा समावेश आहे आतापर्यंत ईडीने निरव मोदीची 2650.07 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात कैद आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी भारत सरकारने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी ब्रिटन सरकारकडे केली आहे. पीएनबी घोटाळ्यात सीबीआयकडून निरव मोदींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. दरम्यान, काही महिन्यापूर्वी नीरव मोदी याचा निकटवर्तीय सहकारी सुभाष शंकर परब याच्यासह 16 जणांना सीबीआयने अटक केली होती. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ गुरुवारी सोनिया गांधी यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले होत़े काँग्रेसच्या जोरदार शक्ति प्रदर्शनात सोनिया गांधी गुरुवारी ‘ईडी’ चौकशीला सामोर्‍या गेल्या़ या प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी देशभर शक्ति प्रदर्शन करत घटनेचा निषेध नोंदविला. तसेच या घटनेस विरोधकांनीही पाठिंबा दिला. सोनिया गांधी यांची चौकशी सुरू झाल्यानंतर मात्र विरोधकांनी सोनियांना पाठिंबा देत भाजपवर टीका केली. तपास यंत्रणांच्या गैरवापराद्वारे राजकीय सूडाची मोहीम सुरू आहे, अशी टीका विरोधकांनी केली. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने छेडण्यात आली. चंडिगढ येथे आंदोलकांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले. आतापर्यंत कुंपणावर असलेली तेलंगणा राष्ट्र समितीही गटात सामील झाली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी गुरुवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत टीआरएस सहभागी झाली होती. भाजपने नुकतेच हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन घेतले होते. तेलंगणामध्ये सत्ता स्थापन करण्याचा ठरावही संमत केला होता. या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजपने दक्षिणेकडे पक्षाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. तेलंगणमध्ये भाजप हा आता टीआरएसचा प्रमुख विरोधक बनू पाहत आहे. त्यामुळे टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपतीच्या निवडणुकीतही टीआरएसने विरोधकांचे सर्वसंमत उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला होता. भाजपच एकहाती सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये जलशक्ती मंत्री दिनेश खटीक यांनी आपण दलित असल्याने अधिकारी दुर्लक्षित करत असल्याचा करत आरोप राजीनामा देणार असल्याचे पत्र व्हायरल झाले. यातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राजकीय वर्तुळामध्ये काय सुरु आहे अशा चर्चांना उधाण आले आहे. हे पत्र त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पाठवल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्यानंतर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही खाटीक यांनी पत्रात केला आहे. दरम्यान, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी भाजपला सत्ता स्थापन करताना अडथळा निर्माण करत आहेत. हे ओळखून त्यांच्याच मंत्रीमंडळातील शिक्षण मंत्र्याने शिक्षण भरतीच्या घोटाळ्यात पार्थ चटर्जी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

COMMENTS