Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांना मिळणार 12 ऐवजी 20 दिवसाच्या किरकोळ रजा : ना. शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : गृह विभागातील पोलीस कर्मचार्‍यांना वर्षभरात 12 किरकोळ रजा मिळत होत्या. आता त्या 20 दिवसांच्या केल्या आहेत. त्याबद्दल पोलीस व

पाटण बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे जाहीर करून कडक शिक्षा द्यावी
स्वातंत्र्य वीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर
प्रकाश हॉस्पिटलवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना : निशिकांत पाटील

सातारा / प्रतिनिधी : गृह विभागातील पोलीस कर्मचार्‍यांना वर्षभरात 12 किरकोळ रजा मिळत होत्या. आता त्या 20 दिवसांच्या केल्या आहेत. त्याबद्दल पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्‍हाडे व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री देसाई म्हणाले, पोलीस कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी पोलिसांच्या रजा वाढल्या पाहिजेत. यासाठी गृह विभागाच्या वतीने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ मान्यता देवून पोलीसांच्या 12 किरकोळ रजेमध्ये वाढ करुन त्या 20 किरकोळ रजा केल्या. तसेच ज्या कर्मचार्‍याची दुसर्‍या दिवशी रजा किंवा आठवडी रजा आहे. अशा कर्मचार्‍याला अगोदरच्या दिवशी रात्रीच्या कर्तव्यावर बोलवू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

COMMENTS