पोलीस पथकाने खाजगी गाडीमधून प्रवास करून सापळा रचत, गुटखा पान मसाला मोठा साठा पकडला

Homeताज्या बातम्या

पोलीस पथकाने खाजगी गाडीमधून प्रवास करून सापळा रचत, गुटखा पान मसाला मोठा साठा पकडला

नगर प्रतिनिधी /येथील परिविक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने खाजगी चार चाकी वाहनाचा वापर करत बंदी असलेला गुटखा, पान मसाला ,सुगंधी तं

मुंबईत राष्ट्रवादीचा ईडी कार्यालयासमोर निषेध मोर्चा
नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढणार ? | LOKNews24
निवडणूकीचे संकेत देणारा अर्थसंकल्प ! 

नगर प्रतिनिधी /
येथील परिविक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने खाजगी चार चाकी वाहनाचा वापर करत बंदी असलेला गुटखा, पान मसाला ,सुगंधी तंबाखू व चार चाकी वाहन जप्त करून तीन आरोपी जेरबंद केले आहे .या कारवाईमध्ये पाच लाख 54 हजार 885 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कर्जत तालुक्यातील राशीन परिसरामध्ये घडली आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की नगर येथील परिविक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळाली की कर्जत तालुक्यातील राशीन भिगवन जाणाऱ्या रस्त्यावर अवैद्य व बंदी असलेला गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू याची वाहतूक होणार आहे .

पोलीस वाहनाचा वापर केल्यानंतर आरोपींना लक्षात येईल. त्यामुळे संतोष खाडे यांनी खाजगी वाहनाचा वापर करून भिगवण होऊन राशीनकडे येणाऱ्या रस्त्यावर राशीन जवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ हे विशेष पोलीस पथक सापळा रचून थांबले होते. इको स्टार कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक एम एच 42 बी 28 32 ही येताच पथकाने गाडी पकडली व तपासणी केली असता गाडीमध्ये अवैद्य गुटक्याच् पांढऱ्या गोण्या व बॉक्स आढळून आले.

याप्रकरणी गाडीमधील संभाजी शिवाजी सरक, राहणार मदनवाडी भिगवन ,अमर अनिल कांबळे राहणार आंबेडकर नगर, राशीन, व भाऊसाहेब किसन सकुंडे राहणार मदनवाडी भिगवन या तिघांना अटक करण्यात आली याशिवाय त्यांच्याकडून एक लाख 54 हजार रुपये किमतीचा बंदी असलेला सुगंधी तंबाखू गुटखा पान मसाला तसेच चार लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची चार चाकी गाडी हा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई संतोष खाडे, राजेंद्र वाघ, शकील शेख, शंकर चौधरी, दिगंबर कारखेले ,दिनेश मोरे, श्री भिंगारदिवे, उमेश खेडकर ,सुनील पवार, अजय साठे, अमोल कांबळे, अक्षय भोसले ,सुनील दिघे व संभाजी बोराडे या पथकाने केली आहे.

COMMENTS