लखनऊ ः उत्तर प्रदेश पोलिस भरती परीक्षेचा पेपर सुमारे 1000 उमेदवारांच्या उपस्थितीत मानेसर, गुरुग्राम येथील एका रिसॉर्टमध्ये सोडवला गेला. पेपर लीक

लखनऊ ः उत्तर प्रदेश पोलिस भरती परीक्षेचा पेपर सुमारे 1000 उमेदवारांच्या उपस्थितीत मानेसर, गुरुग्राम येथील एका रिसॉर्टमध्ये सोडवला गेला. पेपर लीक टोळीने या पेपरसाठी उमेदवारांकडून प्रत्येकी सात लाख रुपयांत सौदा झाला. तारण म्हणून उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे टोळीकडे जमा केली होती. हा खुलासा आरोपी महेंद्र शर्मा याने केला आहे, ज्याने उमेदवारांना पेपर पोहोचवण्यात मदत केली होती. हरियाणातील जिंद येथील महेंद्रला यूपी एसटीएफने अटक केली आहे. फरार मुख्य आरोपी विक्रम पहल याच गावचा आहे. इतर आरोपी मोनू शर्मा, रवी अत्री, अभिषेक शुक्ला हेही पसार आहेत.
COMMENTS