Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यभरात आजपासून पोलिस भरती

17 हजार 471 जागांसाठी 17 लाखांहून अधिक अर्ज

मुंबई ः राज्यातील पोलिस भरतीसाठीच्या प्रक्रियेला आज बुधवारपासून सुरूवात होत आहे. महाराष्ट्राच्या गृहविभागाकडून तब्बल 17 हजार 471 पदांसाठी ही प्रक

गृहखात्याचा मोठा निर्णय, मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलीस भरती
पोलिस भरतीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ
कंत्राटी पोलिस भरतीवरून विरोधकांनी घेरले  

मुंबई ः राज्यातील पोलिस भरतीसाठीच्या प्रक्रियेला आज बुधवारपासून सुरूवात होत आहे. महाराष्ट्राच्या गृहविभागाकडून तब्बल 17 हजार 471 पदांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, या पोलिस भरतीसाठी राज्यभरातून तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले असून ही प्रक्रिया बुधवारपासून म्हणजे 19 जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी मंगळवारी दिली. यासंबंधीच्या वृत्तानुसार, बँड्समन पदासाठी 41 जागा आहेत. त्यासाठी 32 हजार 26 अर्ज मिळालेत. तुरुंग विभागातील शिपाई पदाच्या 1800 जागांसाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज प्राप्त झालेत. चालक पदाच्या 1686 जागांसाठी 1 लाख 98 हजार 300 अर्ज आलेत. याशिवाय पोलिस शिपाई पदाच्या 9595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज प्राप्त झालेत. दुसरीकडे, शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 पदांसाठी 3 लाख 50 हजार 592 अर्ज प्राप्त झाले आहेत.
अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित असून शासकिय नोकरीचे आकर्षण आणि अन्य क्षेत्रात घटलेल्या संध्यांच्या पार्श्‍वभूमिवर अर्ज आले असावेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस पडल्यास त्या विदयार्थ्यांना पुढील तारीख दिली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर उमेदवारानं एका पदासाठी एकदाच फॉर्म भरणं अपेक्षित असून विविध पदांसाठी फॉर्म भरल्यास दोन्ही ठिकाणच्या मैदानी आणि परीक्षेची तारीख एक येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलात 68 रिक्त जागेसाठी एकूण 4175 आवेदन अर्ज प्राप्त झाले असून पोलिस मुख्यालय येथील प्रांगणामध्ये पोलिस शिपाई पदाकरीता पोलिस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 50 अधिकारी आणि 250 कर्मचारी या ठिकाणी उपस्थितीत राहणार आहेत. कोल्हापूर पोलिस दलातील शिपाई पदाच्या 154 आणि पोलिस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 ते 27 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलिस मुख्यालया जवळील पोलिस परेड ग्राउंडवर ही भारतीय प्रक्रिया होणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

पोलिस भरती पारदर्शक व्हावी ः वडेट्टीवार – लाखो विद्यार्थी पोलिस भरतीची राज्यभरात तयारी करत आहे. सरकारने 2022-23 मध्ये पोलिस भरती करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता अखेर या भरतीला सुरूवात झाली आहे. मात्र, ही पोलिस भरती पारदर्शक व्हावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. इतकेच नाही तर पोलिस भरतीसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, एम्बुलंस सुविधा, तात्काळ वैद्यकीय उपचार, ऊन पावसापासून बचाव करण्यासाठी योग्य सुविधा असणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सर्व उमेदवारांना किमान या भरती प्रक्रियेत समान संधी मिळावी अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

COMMENTS