Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयता गँगविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम

पुणे ः हडपसर भागात दहशत माजविणार्‍या सुजीत वर्मा टोळीतील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने सातारा परिसरातून अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून तो

महिलेच्या हत्येप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला अटक
मनोज जरांगेंचं आजपासून आमरण उपोषण सुरु
राज्यात सायबर गुप्तचर विभागाची होणार स्थापना

पुणे ः हडपसर भागात दहशत माजविणार्‍या सुजीत वर्मा टोळीतील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने सातारा परिसरातून अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. राजकिरण उर्फ ओमस्या गणेश भंडारी (वय 22, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसर भागात कोयता गँगने दहशत माजविली होती.
गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हडपसर भागातील कोयता गँगचा म्होरक्या बिट्या कुचेकर याच्यासह साथीदारांना नुकतीच अटक केली होती. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. सराईत गुन्हेगार भंडारी सातारा जिल्ह्यातील नाझिरे गावात असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार पथकाने सापळा लावून त्याला नझिरे गावातून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल आणि पथकाने ही कारवाई केली.

COMMENTS