Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस

पुणे : पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्या दाखल होणार आहे. शिवप्रतिष्ठानच्या धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबांच्य

आजोबांचा आपल्या 13 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार I LOKNews24
काँगे्ससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान
ट्रकने दिली दिशादर्शक बोर्ड पोलला धडक.

पुणे : पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्या दाखल होणार आहे. शिवप्रतिष्ठानच्या धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबांच्या पालखी समोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांच्या ’शिवप्रतिष्ठान’ला एक नोटीस पाठवली आहे. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे नोटीसीत म्हटले आहे.
संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. परंतु, दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. तसेच भिडे गुरुजी जर वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर हरकत नाही, असे आळंदी देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे. यापूर्वी भिडे गुरूजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणल्याने आणि तेढ निर्माण करणारी भाषण केली होती, त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस दिली आहे.  

COMMENTS