श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील पुलवामा येथील पिंगलानामध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस जवान शहीद झालाय. तर सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी
श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील पुलवामा येथील पिंगलानामध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस जवान शहीद झालाय. तर सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी आहे. याबाबत काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार पुलवामाच्या पिंगलाना येथे सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात पोलिस दलाचा एक जवान शहीद झाला. तर सीआरपीएफचा जवान गंभीर जखमी झालाय. या घटनेनंतर सैन्याला पाचारण करण्यात आलेय.तसेच या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, पुलवामाच्या पिंगलानमध्ये झालेल्या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी, जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये लष्कर तैयबाचा एक दहशतवादी पोलिसांनी चकमकीत ठार केला होता. नसीर अहमद भट असे या दहशतवाद्याचे नाव आहे. नासीर अहमदचा अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात होता.
COMMENTS