Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पोलिसांचा पुढाकार

’वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहीम हाती

पुणे/प्रतिनिधी ः सह्याद्रीच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ’वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ हे अभियान पुणे पोलिसांनी हाती घेतले आहे. आठवड्य

कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर
पुलाच्या खर्चातील साडेतीनशे टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला
आयटीआय प्रवेशाची अंतिम तारीख 24 ऑगस्ट

पुणे/प्रतिनिधी ः सह्याद्रीच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ’वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ हे अभियान पुणे पोलिसांनी हाती घेतले आहे. आठवड्यातून एक दिवस गड किल्ल्यांची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली आहे.
सह्याद्रीच्या कुशीत नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या आणि त्यात मावळ तालुक्यात विविध गड किल्ले निसर्ग सौंदर्यातभर घालत आहेत. देश-विदेशातून अनेक पर्यटक व गिरीप्रेमी गड किल्ल्यांना नेहमी भेट देण्यासाठी येत असतात.त्यामुळे मावळाचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गड किल्ल्यांची तसेच बौद्धकालीन लेण्यांची स्वच्छता राखणे व त्याचे संवर्धन करणे यादृष्टीने पुणे ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल आणि अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली टुरिझम पोलिसिंग अंतर्गत हे अभियान राबविण्यात येणार आहे.या मोहिमेची सुरुवात एकविरा गड व कार्यालय येथील बौद्धकालीन लेण्यांची स्वच्छता करून बुधवार (26 एप्रिल)पासून होणार आहे. या अभियानांतर्गत लोणावळा उपविभागातील गड किल्ले व ऐतिहासिक स्थळांची पोलिस, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, पत्रकार, वकील यांच्या सहभागातून स्वच्छता केली जाणार आहे. अभियानाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रत्येक आठवड्यातील एक दिवस गड किल्ले व लेण्यांची स्वच्छता केली जाणार आहे. या अभियानांतर्गत किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तिकोना, किल्ले तुंग, किल्ले राजमाची याचबरोबर कार्ला लेणी, भाजे लेणी, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, राजमाची पॉईंट, भुशी डॅम व सर्वात शेवटी पर्यटनाचे केंद्रस्थान असलेल्या लोणावळा शहराचे देखील स्वच्छता केली जाणार आहे. या अभियानाद्वारे ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण व संवर्धना बरोबरच स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

COMMENTS