Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

15 हजाराची लाच घेताना पोलिस नाईक जाळ्यात

कोल्हापूर / प्रतिनिधी : वादातील इनोव्हा गाडी परत मिळवून देतो असे सांगत 10 हजाराची लाचेची मागणी करणारा पोलिस नाईक लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला आहे.

कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे : कृषीमंत्री दादाजी भुसे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या
‘मेस्को’च्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढणार : मंत्री दादाजी भुसे

कोल्हापूर / प्रतिनिधी : वादातील इनोव्हा गाडी परत मिळवून देतो असे सांगत 10 हजाराची लाचेची मागणी करणारा पोलिस नाईक लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला आहे. शहरातील शाहुपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सागर इराप्पा कोळी (रा. उचगाव ता. करवीर) यास लाच घेताना रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत कायद्याअंतर्गत पोलिस नाईक सागर कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदाराची वादातीत इनोव्हा गाडी परत मिळवून देतो असे सांगत, पोलीस नाईक कोळी याने तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याने आधी 10 हजार रुपये घेतले होते. उर्वरित रकमेसाठी त्याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बम्बर्गेकर यांच्या पथकाने सापळा रचला. मंगळवारी पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना सागर कोळी याला रंगेहाथ पकडले. पोलीस नाईक कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS