केज प्रतिनिधी - केज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शासनाने घालून दिलेल्या आवाजापेक्षा मो
केज प्रतिनिधी – केज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शासनाने घालून दिलेल्या आवाजापेक्षा मोठया आवाजात डीजे वाजून नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सोलापूर आणी उरळी कांचन(पुणे)येथील दोन डीजे च्या मालकसह दोन ऑपरेटर,व दोन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशा सहा जणां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दोन्ही ही डीजे जप्त केले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि,दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी साजरी झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त आयोजीत केलेल्या मिरवणुकांमध्ये शासनाच्या नियमांनुसार डीजे साउंड न वाजवण्या बाबत केज शहरातील सर्व जयंती उत्सव समितीच्या व मिरवणुकांचे अध्यक्ष यांना मिरवणुकी पुर्वी झालेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी कायदेशीर सूचना दिल्या होत्या.व मिरवणुकांमधे डीजे साउंड वाजवू नयेत या बाबतही लेखी सुचना देखील देण्यात आलेल्या होत्या.असे असतानाही दिनांक 14-04-2023 रोजी केज शहरातून सायंकाळी सहा वाजल्या पासुन डॉ.आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणुकांना सुरवात झाली, फुले नगर येथील समाज मंदिरापासून अध्यक्ष सुमेध शिंदे यांनी त्यांचे मिरवणुकीमध्ये एम. एच.44 यु. 1239 या टाटा ट्रेलर वाहनावर डी.जे सिस्टीम लावल्याचे दिसुन आल्यानंतर पोलीस उप निरीक्षक राजेश पाटील यांना सदर डीजे च्या आवाजाची उच्चता तपासणी करण्याचे आदेशीत केल्या वरून त्यांनी,व पोलीस नाईक बाळू सोनवणे यांनी दोन पंचांसमक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक, केज येथे पंचांचे समक्ष साउंड लेवल मिटरने आवाजाचे नमुने घेतले असता सदर डीजे चा आवाज हा शासनाने नेमुन दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सुमारे 103.7 डेसीबल असल्याचे दिसुन आल्या वरून पंचनामा करुन सदर डीजे चालक शंकर सुरेश किणगी वय 33 वर्षे,व्यवसाय डीजे रा. लष्कर कॅम्प,सोलापुर, फुलेनगर मिरवणुकीचे अध्यक्ष सुमेध गुलाबराव शिंदे रा.फुले नगर,केज, यांना मिरवणूक संपताच वाहन पोलीस ठाण्यात लावण्याच्या सूचना दिल्या.त्या नंतर कानडी चौक येथे भीम नगर,केज या मंडळाने देखील एम. एच.14 डी.एम.3322 या टाटा 407 वाहनावर डीजे लावल्याचे आढळुन आले, त्याच्या आवाजाची ही तपासणी केली असता या डीजे चा ही आवाज शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधीक 114.7 डेसीबल असल्याचे दिसुन आले. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष प्रवीण बंडु मस्के रा.भीम नगर,केज,डीजे मालक बिरु बाळु चौगुले वय 35 वर्षे,रा.चोरोची ता.कवठे महांकाळ जि.सांगली यांना सूचना देऊन मिरवणुकी नंतर डीजे पोलीस ठाण्यात लावण्याच्या सूचना दिल्या.मिरवणुक संपल्या नंतर दोन्ही डीजे मध्ये रात्री साडे बारा वाजता पोलीस स्टेशन केज येथे आणुन लावले.यावेळी दोन पंचांसमक्ष पोलीस उपनिरीक्षक राजेशपाटील यांनी दोन्ही डीजे व वाहन जप्त केले.दिनांक 14-04-2023 रोजी सायंकाळी सहा ते दिनांक 15-04-2023 रोजीचे साडे बारा वाजण्याच्या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त फुलेनगर,केज यामंडळाचे अध्यक्ष सुमेध गुलाबराव शिंदे रा.फुले नगर,केज, डीजेचा मालक शंकर सुरेश किणगी वय 33 वर्षे,रा.लष्कर कॅम्प, सोलापुर,या डीजेचा ऑपरेटर कुमार अंबादास संगेपागोळे वय 20 वर्षे, रा.लष्कर कॅम्प,सोलापुर, तसेच भिमनगर,केज मंडळाचे अध्यक्ष,प्रविण बंडु मस्के रा.भिमनगर केज,डीजे चालक,बिरु बाळु चौगुले वय 35 वर्षे, व्यवसाय डॉल्बी चालक, रा.चोरोची ता.कवठे महांकाळ,जिल्हा सांगली व ऑपरेटर युवराज कैलास भालेराव वय 23 वर्षे,रा.उरळी कांचन,पुणे यांनी पोलीस निरीक्षक केज यांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करून शासनाने नेमुन दिलेल्या आवाज मर्यादेचेही उल्लंघन करुन सर्व सामान्य जनतेस त्रास होईल अशा रितीने कर्ण कर्कश रितीने त्यांचे ताब्यातील डॉल्बी साउंड सिस्टीम लावलेले वाहन लोकांना रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने वाहनावर बसवुन,सार्वजनीक उपद्रव करत वाजवीले. म्हणून या सहा जनां विरुद्ध पोलीस नाईक मतीन इब्राहिम शेख यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि.कलम 188,268,283,सह ध्वनी प्रदुषण (विनीयमन व नियंत्रण)अधिनीयम 2000 चे कलम 15 व 19 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
COMMENTS