Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नोटीसांच्या धाकामुळे विष प्राशन

भारत आवचार यांनी केले विष प्राशन; इंदिरानगर रहिवशात तिव्र संताप

बीड प्रतिनिधी - बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेल

पक्वानांच्या ताटात पालीची लघुशंका!
आरोग्य विभागाच्या पेपरफुटीत भाजपच्या पदाधिकार्‍याला अटक | DAINIK LOKMNTHAN
काश्मीरमध्ये कर्नलसह 3 जवानांना वीरमरण

बीड प्रतिनिधी – बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या देण्यात आलेल्या नोटीसांचा धाक घेऊन इंदिरानगर बीड येथील रहिवाशी भारत विठ्ठल आवचार वय 55 वर्ष धंदा मजुरी यांनी बुधवार (दि.14) जून रोजी पहाटे विष प्रशांत करून आत्महत्येचा प्रयत्न केला.या प्रकारास जिल्हा प्रशासन जबाबदार असून सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे.भारत आवचार यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे व तहसीलदार यांनी घर धारकांना सोडलेल्या नोटीसांच्या धाकामुळे घर धारकावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. भारत आवचार यांची प्रकृती चिंताजनक असून घर तोडण्याच्या नोटीसांच्या धाकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाचा इंदिरानगर भागातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रिपाइं वतीने मंगळवार (दि.20) जून रोजी निघणार्‍या मोर्चात युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या विरोधात आवाज उठविण्यात येणार आहे.

COMMENTS