श्रीरामपूर ः ग्रामीण समाजात वाचन, लेखन संस्कृती वाढली पाहिजे, प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील बहुउद्देशीय सांस्कृतिक संस्थेने कारेगावसारख्या ग्रामीण भाग
श्रीरामपूर ः ग्रामीण समाजात वाचन, लेखन संस्कृती वाढली पाहिजे, प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील बहुउद्देशीय सांस्कृतिक संस्थेने कारेगावसारख्या ग्रामीण भागात घेतलेले कविसंमेलन, हळदीकुंकू कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरजभाऊ मुरकुटे पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर जवळील इंदिरानगर भागातील सेवानिवृत्त प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील, सौ. अनिताताई भवार पाटील आणि संयोजकांनी कारेगाव येथील प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील सांकृतिक सभागृहात भरगच्य असे कविसंमेलन, ग्रामीण महिला हळदीकुंकू कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित केले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना नीरज भैय्या मुरकुटे बोलत होते. अध्यक्षस्थानी मातापूर येथील श्रीरामपूर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब उंडे पाटील होते तर कविसंमेलनाचे अध्यक्ष खंडाळा येथील अक्षर साहित्य, सांस्कृतिक मंचचे संस्थापक, अध्यक्ष पत्रकार,संतकवी एकनाथ डांगे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी.ई. शेळके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, मेजर रोहिदास पाटील काळे, माजी सैनिक केरू बाराहाते पत्रकार, कवी, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, राजेंद्र थोरात, कवी बाळासाहेब मुन्तोडे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन, श्री सरस्वती माता प्रतिमा पूजनाने उद्घाटन करण्यात आले. संयोजक प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ. बाबुराव उपाध्ये, राजेंद्र देसाई, बाळासाहेब मन्तोडे, राजेंद्र थोरात, प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील आदिंनी कविता सादर केल्या. संतकवी एकनाथ डांगे पाटील यांनी विविध कविता सादर करीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कविसंमेलन म्हणजे कवी मनातला उत्कट आविष्कार : डॉ. बाबुराव उपाध्ये
डॉ. उपाध्य यांनी कविसंमेलन म्हणजे कवी मनातला प्रबोधनात्मक,उत्कट असा भावाविष्कार असून त्याला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद लाभल्याबद्दल आनंद व्यक्त करीत अध्यक्ष डांगे पाटील व कवींचा परिचय करून दिला.

COMMENTS