Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीएमपीची दोन नव्या मार्गावर सेवा सुरू

पुणे : हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक आणि मुंढवा चौक ते केसनंद फाटा या दोन नव्या मार्गांवर शुक्रवारपासून पीएमपीची सेवा सुरू करण्यात आली आहे.

हिंगोलीत मराठा समाजाच्यावतीने आमरण उपोषण
आपल्या भाषेचे आपणच जतन करावे : मुख्याधिकारी स्मिता काळे 
त्या’ चिमुरड्याच्या खून जन्मदात्या आईकडूनच?

पुणे : हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक आणि मुंढवा चौक ते केसनंद फाटा या दोन नव्या मार्गांवर शुक्रवारपासून पीएमपीची सेवा सुरू करण्यात आली आहे. रेल्वेच्या प्रवाशांसाठी हे दोन मार्ग सुरू करण्यात आले असून, आठवड्यातील रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी ते सुरू राहतील, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली. मगरपट्टा, मुंढवा गाव, मुंढवा चौक, लोणकर कॉलनी असा हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक या गाडीचा मार्ग आहे. रेल्वेच्या वेळेनुसार या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत, तर माळवाडी मांजरी, आव्हाळवाडी, सातव पार्क, वाघोली बाजार असा मुंढवा चौक ते केसनंद फाटा या गाडीचा मार्ग आहे. या मार्गावर दर एक तासाने गाडी सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा या माध्यमातून मिळणार असून, प्रवाशांनी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.

COMMENTS