Homeताज्या बातम्यादेश

पीएम-युवासाठी 43 युवा लेखकांची निवड

लेखकांना दरमहा 50 हजार रूपयांची शिष्यवृत्तीनवी दिल्ली ः शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ’नॅशनल बुक ट्रस्ट’ - इंडिया द्वारे राबविल्या जाणार्‍या ’युवा

तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे हस्ते विठ्ठल मंदिरात आरती  
बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या तालुकध्यक्षपदी शरद खरात
वारकर्‍यांना मिळणार विमा संरक्षण

लेखकांना दरमहा 50 हजार रूपयांची शिष्यवृत्ती
नवी दिल्ली ः शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ’नॅशनल बुक ट्रस्ट’ – इंडिया द्वारे राबविल्या जाणार्‍या ’युवा लेखकांसाठीच्या पंतप्रधान मार्गदर्शन योजना’ (पीएम- युवा 3.0) चे निकाल एनबीटी-इंडिया च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरून, युवा लेखकांना त्यांच्या लेखनातून आणि विचारांतून राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
या आवृत्तीअंतर्गत, 30 वर्षांखालील 43 युवा लेखकांच्या पुस्तक प्रस्तावांची निवड एका अखिल भारतीय स्पर्धेद्वारे करण्यात आली. यामध्ये इंग्लिशसह 22 अधिकृत भारतीय भाषांचा समावेश आहे, ज्यात आसामी, बांगला, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मैथिली, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश आहे. या व्यापक भाषिक सहभागामुळे भारतातील सर्वसमावेशक साहित्यिक विकासाला चालना देण्याचे योजनेचे उद्दिष्ट अधिक बळकट झाले आहे. निवडलेल्या 43 लेखकांपैकी 19 महिला आणि 24 पुरुष आहेत.
निवडलेल्या या पुस्तक प्रस्तावांना नामवंत विद्वानांच्या सहा महिन्यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तकांचे रूप दिले जाईल. प्रत्येक निवडलेल्या लेखकाला दरमहा 50,000 रुपये शिष्यवृत्ती आणि त्यांच्या प्रकाशित पुस्तकावर आयुष्यभर 10% रॉयल्टी मिळेल. पीएम-युवा  3.0 चे विषय खालीलप्रमाणे होते: राष्ट्र उभारणीत परदेशस्थ भारतीय समुदायांचे योगदान, भारतीय ज्ञान प्रणाली, आधुनिक भारताचे निर्माते (1950-2025) निवडलेले हस्तलिखित साहित्य हे ’नॉन-फिक्शन’ (वास्तववादी) प्रकारातील असून, ते इतिहास, संस्कृती, विज्ञान, तत्त्वज्ञान, प्रशासन, समाजसुधारणा आणि भारताचा जागतिक सहभाग यांसारख्या विषयांद्वारे भारताचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य प्रतिबिंबित करते.

COMMENTS