नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील यशोभूमी येथे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील यशोभूमी येथे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी आयोजित ‘सेमिकॉन इंडिया – 2025’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 पासून या परिषदेत सक्रिय सहभाग घेतील व सीईओ गोलमेज बैठकीतही भाग घेतील. 2 ते 4 सप्टेंबर या तीन दिवसांच्या परिषदेत भारतामध्ये मजबूत, लवचिक आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
या परिषदेत खालील महत्त्वाचे विषय चर्चिले जातील :
- सेमिकॉन इंडिया कार्यक्रमातील प्रगती
- सेमीकंडक्टर फॅब आणि प्रगत पॅकेजिंग प्रकल्प
- पायाभूत सुविधा, स्मार्ट उत्पादन व संशोधन-विकास
- कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नवे शोध
- गुंतवणूक संधी आणि राज्यस्तरीय धोरणांची अंमलबजावणी
- डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (DLI) योजना
- स्टार्टअप परिसंस्था आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य
या परिषदेत 20,750 पेक्षा जास्त सहभागी उपस्थित राहतील. त्यामध्ये 48 देशांमधील 2,500 प्रतिनिधी, 150 हून अधिक वक्ते, 50 हून अधिक जागतिक नेते आणि 350 प्रदर्शकांचा सहभाग असेल. याशिवाय, 6 देशांची गोलमेज चर्चा, विशेष देश पॅव्हिलियन्स, कामगार विकास आणि स्टार्टअप पॅव्हिलियन्स यांचाही समावेश असेल.
जागतिक स्तरावर सेमिकॉन परिषदांचे उद्दिष्ट सेमीकंडक्टर क्षेत्रातील तांत्रिक प्रगती, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि धोरणांचा प्रसार करणे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भारताला सेमीकंडक्टर डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग व तंत्रज्ञान विकासाचे केंद्र बनविण्याच्या दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले गेले आहे.
याआधी 2022 मध्ये बेंगळुरू, 2023 मध्ये गांधीनगर आणि 2024 मध्ये ग्रेटर नोएडा येथे अशा परिषदा झाल्या होत्या.

COMMENTS