Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींची 7 मे रोजी अहमदनगरमध्ये सभा

भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची माहिती

अहमदनगर ः महायुतीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 7 मे रोजी अहमदनगर शहरातील सं

खासदार लंके यांचे निवडणूक निधी देणार्‍यांसाठीच आंदोलन ?
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींब्या देण्यासाठी पाथर्डीत लोकशाही मार्गाने बैठा सत्याग्रह
म्हैसगाव येथील खासगी सावकार गजाआड

अहमदनगर ः महायुतीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 7 मे रोजी अहमदनगर शहरातील संत निरंकारी भवन जवळचे मैदान, सावेडी येथे सांयकाळी 4 वाजता सभा घेणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली आहे. यामुळे नगरकरामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये 6 तारखेला होणार होती. मात्र पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा एक दिवस पुढे ढकल्याने ही सभा आता  7 मे रोजी नियोजीत वेळेत होणार आहे. सध्या प्रचार अखेरच्या दिवसात असल्याने सर्वांना या सभेचे वेध लागले होते. पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा नगरच्या भूमीत येत आहेत. निवडणुकीत आधीच खा. डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने सध्या जिल्ह्यात त्यांचे वातावरण असून पंतप्रधानांच्या सभेने त्यात अधीक भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.  नगरच्या निरंकारी मैदान येथे पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. नगरकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विशेष प्रेम असून त्यांना ऐकण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी लोटणार असून त्याचे नियोजन करण्यात सर्व महायुतीचे घटक पक्ष काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS