Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींकडून माझ्या वडिलांचा अवमान ः राहुल गांधी

भारतात वडिलांचे आडनाव लावतात हे त्यांना ठावूक नसावे का

वायनाड /वृत्तसंस्था ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलतांना म्हणाले होते की, गांधी कुटुंब नेहरू आडनावाऐवजी गांध

रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करणार्‍या वाहन चालकावर गुन्हा
यंदा उष्णतेने मोडला 122 वर्षांचा ’रेकॉर्ड’
महाराष्ट्रातही ’लव्ह जिहाद’ विरोधी कायदा हवा – चित्रा वाघ

वायनाड /वृत्तसंस्था ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलतांना म्हणाले होते की, गांधी कुटुंब नेहरू आडनावाऐवजी गांधी नाव का वापरते असा सवाल केला होता. यावर हल्लाबोल करतांना, काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ’मोदींनी माझे नाव गांधी का आहे, नेहरू का नाही असा प्रश्‍न केला. हा माझा अपमान आहे. भारतात वडिलांचे आडनाव लावलात. कदाचित हे मोदींना ठावूक नसावे असा टोला लगावला.
राहुल गांधी केरळमधील वायनाड या आपल्या लोकसभा मतदार संघातील एका सभेला संबोधित करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडातून अदानींचे नाव बाहेर पडत नाही. ते राज्यसभा व लोकसभेत जोरदार भाषण करतात. पण एकदाही अदानींचे नाव त्यांच्या तोंडात आले नाही. याचा अर्थ सरकार या दलदलीत अत्यंत वाईट पद्धतीने फसली आहे. सरकार तपासापासून पळ का काढत आहे? राहुल म्हणाले की,पंतप्रधान स्वतःला खूप ताकदवान समजतात. आपल्याला सर्वचजण घाबरतात असे त्यांना वाटते. पण तसे नाही. आम्ही त्यांना घाबरत नाही. मी संसदेत खरे तेच सांगितले. त्यामुळे माझ्या मनात कोणतीही भीती नव्हती. माझा अपमान केल्याने काहीच होणार नाही. सत्य उजेडात आल्याशिवाय राहणार नाही. राहुल म्हणाले की, माझा चेहरा पाहा व जेव्हा ते बोलतात त्यांचा चेहरा पाहा. त्यांनी बोलताना कितीदा पाणी पिले हे पाहा. पाणी पितानाही त्यांचा हात थरथर कापत होता. माझ्या भाषणातील एक भाग संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला. पण पंतप्रधानांचा एकही शब्द वगळण्यात आला नाही. मी कुणाचाही अपमान केला नाही. याऊलट मी जे म्हणालो त्यासंबंधी मला पुरावे दाखवण्याची नोटीस बजावण्यात आली. मी यासंबंधी लोकसभेच्या अध्यक्षांना एक पत्रही लिहिले आहे. मी केवळ वस्तुस्थिती मांडल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.

COMMENTS