Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओमसिंग भैसडे यांच्यावतीने वृक्षारोपण

विद्यार्थ्यांना भोजन देत दरडवाडी शाळेत राबला उपक्रम

जामखेड ः जामखेड तालुक्यातील खर्डा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरडवाडी येथे शिक्षण सप्ताह निमित्त  इको क्लब उपक्रम-शालेय पोषण दिवसनिमित्

चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ
पालखी सोहळ्यातून राजमुद्रा प्रतिष्ठाणने धार्मिक परंपरा जपली
कर्तृत्व आणि नेतृत्व गुणांचा संगम म्हणजे स्व.शंकरराव काळे-उपमुख्यमंत्री

जामखेड ः जामखेड तालुक्यातील खर्डा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरडवाडी येथे शिक्षण सप्ताह निमित्त  इको क्लब उपक्रम-शालेय पोषण दिवसनिमित्त शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच राणा रजपूत तरुण मंडळाचे अध्यक्ष ओमसिंग भैसाडे व सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी समुदाय सहभाग दिवसानिमित्त गावामध्ये सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना विद्यांजली कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच शाळेस मदत करणार्‍या दानशूर व्यक्तींची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लावण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ओमसिंग भैसडे यांच्यावतीने मुलांना गोड सुरुची भोजन देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  बबन बारगजे सर,शाळेतील शिक्षक धिरज उदमले सर ग्रामस्थ व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS