Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयहिंद लोकचळवळ व कर्‍हेश्‍वर विद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण

संगमनेर ः काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात वृक्षरोपणाची दंडकारण्य अभिय

कॉ.आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव होत असल्याने साहित्यिकांमध्ये चैतन्य
महात्मा फुले विद्यालयात गुरुकुल पालक मेळावा उत्साहात
राहीबाई पोपेरे यांची बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट

संगमनेर ः काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात वृक्षरोपणाची दंडकारण्य अभियानांतर्गत मोठी चळवळ सुरू झाली असून यामध्ये जय हिंद लोक चळवळ व कर्‍हेश्‍वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.
कर्‍हे येथे, कलेश्‍वर विद्यालय व जय हिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मार्गदर्शक प्रा. बाबा खरात, प्रकल्प प्रमुख प्रा. गणेश गुंजाळ, मुख्याध्यापक उत्तम वाघ, बाबासाहेब गायकवाड संपत सांगळे, युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, सुभाष सानप, देवराम गुळवे, रोहिदास सानप चंदन दळवी, सुनील गुळवे, गौतम तपासे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गावातून घोषणा देत 251 वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रा बाबा खरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचे हे अठरावे वर्ष आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला असून वृक्ष हे माणसाचे खरे मित्र आहेत कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले मात्र आता सर्वजण विसरून गेले पुन्हा कोरोनाचे दिवस आणायचे नसतील तर वृक्षाचे संवर्धन केलेच पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. तर प्रा. गणेश गुंजाळ म्हणाले की, दंडकारण्य हे पर्यावरण संवर्धनाचे अभियानातून ही लोक चळवळ होण्यासाठी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे यांचा वाढदिवस वृक्ष संवर्धन दीन म्हणून साजरा होत असून त्यानिमित्त गावोगावी वृक्षारोपण करण्यात आले आहे आणि या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिकांवर देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम वाघ यांनी केले तर सुधीर दरेकर यांनी आभार मानले.

COMMENTS