Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुरुपौर्णिमा निमित्त स्वामी मुक्तानंद उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्गत वृक्ष रोपण व विविध कार्यक्रम

येवला-  शहरातील सुप्रसिद्ध श्रीगुरूदेव शिक्षण प्रसारक   मंडळ चे स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे  गुरुपौर्णिमा निमित्त उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यास

चिपळूणला पूराचा वेढा ; कोकणात हाहाकार
सत्तेसाठीच सारे काही !
महाराष्ट्रासह देशभरात ईडीने घेतली झाडाझडती

येवला–  शहरातील सुप्रसिद्ध श्रीगुरूदेव शिक्षण प्रसारक   मंडळ चे स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे  गुरुपौर्णिमा निमित्त उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्गत  इयत्ता 11वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यासाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या दोन्ही स्पर्धेत सर्व मुलांनी सहभाग नोंदविला. प्रथम तीन विदयार्थ्यांना पारितोषिके विद्यालयाचे प्राचार्य एम.टी कदम सर व उपप्राचार्य बी.एस आहेर सर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एम टी कदम सर यांनी विदयार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले. प्राध्यापक बी.एसहआहेर सर व सौ मेहतर मॅडम यांनी ही गुरुपौर्णिमा चे महत्व आपल्या मनोगतातुन केले.निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे सर्व नियोजन व परीक्षण मराठी विषयाचे प्राध्यापिका सौ मेहतर मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.एस आहेर सर व सूत्रसंचालन प्राध्यापक डी.जी खरे सर यांनी केले. व आभार एम.एस बोरकर सर यांनी केले.   प्राध्यापक सर्वश्री आहेर सर, बोरकर सर, खरे सर, बाविस्कर सर, वैभव माळी सर, प्राध्यापिका मेहतर मॅडम. डाॅ मनीषा गोसावी मॅडम,प्रा सौ आशा डांगरे मॅडम, कोटमे मॅडम, व लिपिक संतोष मिसाळ सर व सेवक अण्णा पवार उपस्थित होते.या नंतर शाळेच्या मैदानावर भारतीय वृक्षांची निवड करून वृक्षारोपण करण्यात आले.

COMMENTS