Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक तापमानवाढीवर वृक्षारोपण हाच पर्याय

डॉ. प्रदीप दिघे यांचे प्रतिपादन

लोणी ः दिवसेंदिवस जंगलतोड होत असल्यामुळे तसेच वाढत्या शहरीकरणामुळे तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे जागतिक तापमान वाढत चालले

उड्डाणपुलाच्या कामासाठी शासकीय जमीन कमी संपादन करत खाजगी जमीन जास्त संपादन करत असल्याचा आरोप
जामखेड नगरपरिषद कर्मचारी संपावर
आ. रोहित पवार युवकांसह करणार उपोषण

लोणी ः दिवसेंदिवस जंगलतोड होत असल्यामुळे तसेच वाढत्या शहरीकरणामुळे तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे जागतिक तापमान वाढत चालले आहे, त्याचा परिणाम सर्वच प्राणीमात्रांना सहन करावा लागतो आहे, त्यावर वृक्षारोपन हाच पर्याय असल्याचे डॉ. प्रदिप दिघे यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या सिंधू गार्डनमध्ये एच.डी.एफ.सी. बँक आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 100 विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे मुख्य लेखापाल अशोकराव पानगव्हाणे, एच.डी.एफ.सी. बँकेचे अधिकारी सुशिल पवार, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता आहेर, शिवाजी आहेर, पोलिस हेड कॉन्स्टेबल एकनाथराव सांगळे, रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आंधळे  पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे एकनाथ सरोदे, तसेच सेवानिवृत्त कृषि अधिकारी  रतन कडू, लोणी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक वाघमारे, सुधाकर कोते, बाबासाहेब गवते, विठ्ठलराव साळवे, महिला व तरूण वर्ग उपस्थित होते. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब सारंगधर म्हस्के पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाने 300 मीटर रनिंग ट्रॅक व इतर सुविधा या सिंधू गार्डनमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या सुविधेचा लोणी खुर्द, लोणी बु. व परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व खेळाडू लाभ घेत आहेत. डॉ. दिघे पुढे म्हणाले की, वृक्षारोपण करणे म्हणजे दुसर्‍याला जीवनदान देण्यासारखे आहे. आपण लावलेले प्रत्येक झाड जगाचा तारणहार बनणार आहे, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्याला माहिती आहेच की, झाडे मनुष्याला हानिकारक असणारा वायू कार्बनडायऑक्साईड हा शोषून घेतात व ऑक्सिजन उत्सर्जित करतात, त्यामुळे अधिकाधिक वृक्षारोपन केल्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. कोविडच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिनचे महत्व लक्षात आलेले आहेच. येथून पुढे प्रत्येकाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसांनिमित्ताने किंवा इतर समारंभाच्या निमित्तानेही विविध प्रकारच्या वृक्षांची, वनौषधींची रोपेच भेट दिली जावीत व प्रत्येकाने त्याचे संवर्धन करावे आवाहनही डॉ. प्रदीप दिघे यांनी केले. महाविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण घोटेकर यांचे कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यासाठी मोठे सहकार्य लाभले.

COMMENTS