नाशिक: आयनॉक्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३ रोजी खुला होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी बुधवार, १३ डिसेंबर, २०२३ र
नाशिक: आयनॉक्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३ रोजी खुला होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी बुधवार, १३ डिसेंबर, २०२३ रोजी बोली लावता येईल. ही ऑफर गुरुवार १४ डिसेंबर, २०२३ रोजी खुली होईल आणि सोमवार, १८ डिसेंबर, २०२३ रोजी बंद होईल. या ऑफरसाठी प्रत्येक इक्विटी शेयरसाठी ६२७ ते ६६० रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी २२ इक्विटी शेयर्ससाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास २२ पटीत बोली लावता येईल. समभाग विक्री करण्यासाठी इच्छुक असलेल्या समभागधारकांसाठी २,२१,१०,९५५ पर्यंत इक्विटी शेयर्सच्या विक्रीतून भांडवल उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे.समभाग विक्रीसाठी ऑफरमध्ये सिद्धार्थ जैन यांच्याकडून १०४३७३५५ पर्यंत, पवन कुमार जैन यांच्याकडून ५०००००० पर्यंत, नयनतारा जैन यांच्याकडून ५०००००० पर्यंत, इशिता जैन यांच्याकडून १२००००० पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर), मंजू जैन यांच्याकडून २३०००० पर्यंत, लता रुंगटा यांच्याकडून १९०००० पर्यंत, भारती शाह यांच्याकडून १३४०० पर्यंत, कुमुद गंगवाल यांच्याकडून १३४०० पर्यंत, सुमन अजमेरा यांच्याकडून १३४०० पर्यंत आणि रजनी मोहता यांच्याकडून १३४०० पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे इतर समभागधारक) यांच्या समभागांचा समावेश आहे.
COMMENTS