Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रियाविरूद्ध सुनेत्राला उभे करणे चूकच

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली

मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची लगबग सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून स

आमच्यात फाटले, उगीच शंका ठेवू नका
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांबरोबर
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची लगबग सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे, ही एक मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचे नसते. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते असे अजित पवार म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, उमेदवारीचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाकडून घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझे मन मला सांगते, तसे व्हायला नको होते, अशी कबुली अजित पवार एका मुलाखतीत दिली. बारामतीत पवार घराण्यातील दोन व्यक्तींना आमनेसामने लढवण्याची चूक लक्षात आल्यानंतर तुम्ही आता रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असा प्रश्‍न अजित पवार यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार, असे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पक्षाने प्रसिद्धी आणि प्रचाराच्या बाबतीत कात टाकल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमासंवर्धनासाठी एका कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीने सल्ला दिल्यानुसार अजित पवार गटाकडून सध्या राज्यातील महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यासाठी अजित पवारांकडून सुरु असलेले पिंक पॉलिटिक्स चर्चेचा विषय ठरत आहे.

COMMENTS