Homeताज्या बातम्यादेश

11 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडणी

नवी दिल्ली : जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा निग्रहपूर्वक पुनरुच्चार करूया. जलसंवर्धन आणि आपल्या नाग

ईलेक्ट्राॅल बाॅण्डही फुसका बार ठरेल का ?
औरंगाबादमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
काँग्रेसची माघार…शेंडगे व भोसले झाले बिनविरोध ; महापौर-उपमहापौर निवड़ीची आज होणार अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा निग्रहपूर्वक पुनरुच्चार करूया. जलसंवर्धन आणि आपल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आपला देश जल जीवन मिशनसारख्या अनेक उपाययोजना करत आहे.  दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून दरवर्षी  जागतिक जल दिन साजरा करायला सुरुवात केली, त्यानुसार जल दिन साजरा केला जातो आणि सध्या सुरक्षित पाण्याच्या उपलब्धतेशिवाय जगत असलेल्या 2 अब्ज लोकांबद्दल जनजागृती केली जाते. जागतिक जल दिनाचा भर प्रामुख्याने शाश्‍वत विकास उद्दिष्ट (एसडीजी ) 6: 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता या दिशेने कृती करण्यास प्रेरित करण्यावर आहे.

COMMENTS