Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवाशांच्या सेवेत ‘पिंक रिक्षा’ दाखल !

नाशिक । प्रतिनिधी महिला सक्षमीकरणास चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार दिला आहे. याअंतर्गत शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा वितर

शिवचरित्रातून लोककल्याणकारी कार्यपद्धतीची प्रेरणा मिळते : डॉ. नितीन राऊत
कोतवाली पोलिस ठाण्यातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव
उड्डाणपुलाच्या कामात वाहतूक पोलिसांचा अडथळा

नाशिक । प्रतिनिधी महिला सक्षमीकरणास चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार दिला आहे. याअंतर्गत शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा वितरित केली आहे. आता या रिक्षा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. शहरात महिलांसाठी पिंक रिक्षा धावू लागल्याने सुरक्षित प्रवासाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे. मागील महिन्यातच शहरातील महिला लाभार्थी नीता बागूल आणि शोभा पवार या दोन गरजू महिलांना रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुंजूनूवाला यांच्या हस्ते पिंक रिक्षांचे वितरण केले होते. रोटरी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल बरडीया आणि सचिव ओमप्रकाश रावत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. नुकताच या रिक्षा प्रवासी सेवेसाठी दाखल झाल्या आहेत. उपक्रमांतर्गत रोटरी संस्थेमार्फत शहरात आणखी पिंक रिक्षा देण्याचा मनोदय अध्यक्ष प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केला आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी पुढे येत आहेत. आणखी 6 ते 7 पिंक रिक्षा गरजू महिलांना द्यायच्या असून, रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या गरजू महिलांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आरटीओ परवाना तसेच प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड या कागदपत्रांसह कर्ज घेण्याची पात्रता आहे, अशा गरजू महिलांनी येत्या 27 मेपर्यंत अर्जासह रोटरी क्लब ऑफ नाशिक सभागृहात भेट द्यायची आहे. अर्जांची पडताळणी आणि छाननी करून पात्र आणि गरजू महिलांची निवड विशेष समितीमार्फत केली जाईल, असे कळविले आहे.

COMMENTS