नवी दिल्ली ः घामाच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी आणि सुंगधासाठी अनेक जण परफ्यूमचा वापर करतात. यामुळे दुर्गंधीपासून सुटका मिळून सुंगधामुळे फ्रेशही
नवी दिल्ली ः घामाच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी आणि सुंगधासाठी अनेक जण परफ्यूमचा वापर करतात. यामुळे दुर्गंधीपासून सुटका मिळून सुंगधामुळे फ्रेशही वाटते. मात्र डीजीसीएकडून वैमानिकांना परफ्युम वापरू नये असे निर्देश लवकरच जारी करण्यात येतील अशी शक्यता आहे. विमान उड्डाण करणे फार जोखमीचे काम आहे. वैमानिक तसेच केबिन कर्मचार्यांनी विमान उड्डाण करण्यापूर्वी परफ्युम लावणे टाळले पाहिजे. तसेच विशिष्ट प्रकारच्या माऊथवॉशचा उपयोग करणे टाळावे. कारण यामध्ये अल्कोहोलचा वापर असतो. त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात असे डीजीसीने म्हटले आहे. याकरिता सिव्हिल एव्हिएशनच्या नियमांत बदल करण्यासाठी चाचपणी करण्यात आली.
COMMENTS