नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईत कबुतरखाने मोठ्या प्रमाणात तयार होताना दिसत आहेत. मुख्य रस्त्यांवर अनेकजण कबुतरांना खाद्य टाकून कबुतरे जमा करतान
नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईत कबुतरखाने मोठ्या प्रमाणात तयार होताना दिसत आहेत. मुख्य रस्त्यांवर अनेकजण कबुतरांना खाद्य टाकून कबुतरे जमा करतानाचे चित्र आहे. ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावर कबुतरांची मोठी वर्दळ आसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. अंधश्रद्धेचा भाग म्हणूनही काहीजण कबुतरांना खाद्य टाकतात, हेच कबुतर जवळच्या इमारतीत आपले घर बनवतात आणि त्यातून रोगाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे हे कबुतरखाने बंद व्हावेत म्हणून अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून पालिकेने अजून काहीच उपाययोजना केल्याचे दिसत नाही. पालिकेने याबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी तक्रारदार योगेश चव्हाण यांनी केली.
COMMENTS