राज्यात तुकडा बंदी व्यवहार नियमित होणार- ना. बावनकुळे

Homeताज्या बातम्या

राज्यात तुकडा बंदी व्यवहार नियमित होणार- ना. बावनकुळे

संगमनेर / प्रतिनिधीविधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आ.अमोल खताळ यांनी नगर पालिका हद्दीत व हद्दी लगत नागरी वस्तीत लागू असलेला तुकडाबंदी कायदा रद्द क

कर्जतमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन : मंत्री प्रकाश आबिटकर
एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं आयुष्य

संगमनेर / प्रतिनिधी
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आ.अमोल खताळ यांनी नगर पालिका हद्दीत व हद्दी लगत नागरी वस्तीत लागू असलेला तुकडाबंदी कायदा रद्द करण्या च्या मागणीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेले सर्व व्यवहार नियमित करण्याचे आश्वासन दिल्याने राज्यातील लाखो कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात तुकडाबंदी कायद्यानूसार एक किंवा दोन गुंठ्यांचे व्यवहार केलेल्या नागरीकांना तुकडाबंदी कायद्याच्या बंधनामुळे घेतलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम किंवा त्या जागांचे व्यवहार सुध्दा करता येत नव्हते. या संदर्भात आ.अमोल खताळ यांनी लक्षवेधी द्वारे शासनाचे लक्ष वेधत तुकाडाबंदी कायद्याची अट रद्द करावी, या महत्व पूर्ण मागणीवर उतर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि नगर पंचायत क्षेत्राच्या हद्दीत व हद्दी लगत ज्या भागात तुकाडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असेल त्या भागामध्ये दि. १ जानेवारी २०२५ पर्यत झालेल्या व्यवहाराकरीता नियम शिथिल करण्याचे जाहीर केले.

तसेच तुकडाबंदी कायद्याच्या संदर्भात राज्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुद्रांक आयुक्त आणि जमाबंदी आयुक्त आणि नगरविकास सचिव यांची समिती नेमून येत्या पंधरा दिवसात तुकडा बंदी बाबत निश्चित मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याची घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली.

COMMENTS