बुलढाणा प्रतिनिधी - अमरावती पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचे बुलढाणा शहरात बॅनर लावण्यात आलेत, मात्र या बॅनरवर

बुलढाणा प्रतिनिधी – अमरावती पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचे बुलढाणा शहरात बॅनर लावण्यात आलेत, मात्र या बॅनरवर एकाही स्थानिक नेत्यांचा किंबहुना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील जिल्हाध्यक्षांचे देखील फोटो टाळण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. अमरावती मतदारसंघाची जागा ही काँग्रेसकडे गेली. मात्र काँग्रेसला उमेदवार मिळाला नसल्याने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राहिलेले बुलढाण्यातील धीरज लिंगाडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांनी बुलढाण्यात आपले बॅनर देखील लावले आहेत, मात्र या बॅनरवर राष्ट्रीय नेते वगळता एकही स्थानिक नेत्यांचा फोटो दिसून येत नाही.
COMMENTS