गणेश दाणे कोपरगाव -तालुक्यातील पढेगांव ग्रामपंचायत सार्वत्रिक निडणूक सन-२०२२-२७ निवडणूकीसाठी येत्या रविवारी १८ तारखेला मतदान होणार असुन २० तार

गणेश दाणे
कोपरगाव -तालुक्यातील पढेगांव ग्रामपंचायत सार्वत्रिक निडणूक सन-२०२२-२७ निवडणूकीसाठी येत्या रविवारी १८ तारखेला मतदान होणार असुन २० तारखेला निकाल आहे.त्यासाठी सर्वसाधारण स्री सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी २८उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असुन मतदारांची संख्या बावीसशेच्या आसपास आहे. पाच गट निकराची लढत देत आहे. प्रचाराची रंगत चांगलीच वाढली असुन प्रत्येक गट आश्वासनांची सरबत्ती करत मतदारांची मने वळवण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे.
सरपंच पदासाठी एकुण पाच उमेदवार असुन परिवर्तन पॕनल (काळेगट सौ.मिना बाबासाहेब शिंदे,सदस्य उमेदवार ९)जनशक्ती परिवर्तन पॕनल (प्रहार,सौ.मंगल बद्रिनाथ शिंदे,सदस्य उमेदवार ३)जनसेवा पॕनल (कोल्हेगट सौ.अर्चना शांताराम शिंदे सदस्य उमेदवार ९)जनप्रवाह पॕनल(कोल्हे गट सौ.मिनाक्षी रामकृष्ण शिंदे सदस्य उमेदवार ७) शिवसेनेच्या सौ.संगिता बाळासाहेब मापारी(एकमेव) निवडणूक लढवत असुन सर्वच उमेदवारांनी ग्रामदैवताला श्रीफळ वाढवून प्रचाराला शुभारंभ केला आहे.

गावाची रचना चार प्रभागात असुन प्रभाग क्र.१साठी दोन ,प्रभाग क्र.२साठी तिन, प्रभाग क्र.३साठी तिन ,प्रभाग क्र.४साठी तिन अशे एकुण ११उमेदवारांपैकी अनुसुचित जमातीचे एक स्री आणि एक पुरुष बिनविरोध निवडून आलेलेआहे. पाचही महिला सरपंच उमेदवार प्रथमच निवडणूक लढवत असुन जनमताचा कौल प्राप्त झालेल्या महिलेस चार हजार लोकसंख्येचे आणि गावाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

या निवडणूकीत प्रचाराची धामधुम विधानसभेला लाजवेल अशी असुन उमेदवारांची फ्लेक्स बोर्ड,प्रचारासाठी गाड्या आणि साथीला सोशल मिडीयाचा वापर सुरु असुन आॕडीयो आणि व्हिडीओ क्लीप ,फ्लेक्स बोर्ड व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे,सर्वच उमेदवार नात्या गोत्यातील बाराही महिने एकत्र उठबस करणारे असल्यामुळे मतदारांपुढे चांगलाच पेच पडल्यामुळे मतदारही गावात मोकळेपणानं न बोलता मौन बाळगून असल्याचे सध्यातरी दिसत असुन मी निवडून येणारच हा आत्मविश्वास प्रत्येक उमेदवार मनात बाळगून आहे.



त्यातच सोशल मिडीयावर अधुनमधुन नोटा आणि सरपंच कसा असावा?गावात रस्ता आणणाऱ्याला मत द्या गावाला रस्त्यावर आणणाऱ्याला नाही या आशयाचे जनजागृतीचे मेसेचही चांगलेच फिरताना दिसत आहे
COMMENTS