Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तांबवे येथील डॉ. शलाका पाटील यांना पीचडी

कराड / प्रतिनिधी : तांबवे (ता. कराड) येथील डॉ. शलाका तात्यासाहेब पाटील यांना विद्यावाचस्पती ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी भारतीय विज्ञान शि

पाचगणी बसस्थानकात पुन्हा लाल परी प्रवाशांच्या सेवेत रुजू
अज्ञात वाहनाच्या धडकेत संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोकराव भावके ठार
शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कराड / प्रतिनिधी : तांबवे (ता. कराड) येथील डॉ. शलाका तात्यासाहेब पाटील यांना विद्यावाचस्पती ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान या केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राप्त केली. डॉ. शलाका यांचा शोध प्रबंध Role of Lamin B Receptor in nuclear organization and chromosomal stability हा असून त्यांना डॉ. कुंदन सेनगुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. श्रीमंत गायन आणि प्रो. जोआना ब्रिजर हे बाह्यपरीक्षक होते. तसेच डॉ. मयुरिका लहीरी आणि डॉ. ऋचा रिखी यांच्या उपस्थितीत डॉ. शलाका यांची मौखिक परीक्षा झाली. डॉ. शलाका यांचे संशोधन आतड्याच्या कॅन्सरमधील पेशींच्या गुणसूत्रे तसेच जनुकीय बदलांवर आधारित आहे. कॅन्सरच्या पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या असंतुलित होते आणि हा गुणसूत्रांचा बदल कॅन्सर पेशींच्या वाढीसाठी अनुकूल होतो. Lamin B Receptor ह्या पेशी केंद्रक पटलावरील प्रथिनांमुळे गुणसूत्रांची संख्या संतुलित राहण्यास मदत होते. परिणामी, LBR जनुकांची अभिव्यक्ती ही ट्युमर उत्पादनासाठी प्रतिकूल आहे. या संशोधनामुळे आतड्याच्या कर्करोगावरील मूलभूत संशोधनासाठी एक नवीन दिशा मिळाली आहे.
डॉ. शलाका यांचे संशोधन कार्य ह्यूमन मॉलेक्यूलर जेनेटीक्स या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या नियतकालिकात प्रसिध्द झाले आहे. डॉ. शलाका यांचे शालेय शिक्षण भारती विद्यापीठमध्ये झाले असून त्या पुणे विद्यापीठातून एमएससी मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रथम आल्या होत्या. तसेच नेट परीक्षेमध्ये त्यांचा देशामध्ये 22 वा नंबर आला होता. डॉ. शलाका यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी.

COMMENTS