Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी झेप

शेवगाव तालुका : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित न्यू आर्ट महाविद्यालय अहिल्यानगर  येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील अविष्कार स्पर्धेम

भारत-रशिया व्यापार सहकार्याला चालना देणारी उद्योजकांची राऊंडटेबल चर्चा संपन्न
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शंभर दिवसांचे उद्दीष्ट ८२ दिवसात पूर्ण
रूपाली बोराडे पाटील यांना बेस्ट ड्रेस डिझायनर अवार्ड
Displaying IMG-20251020-WA0300.jpg

शेवगाव तालुका : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित न्यू आर्ट महाविद्यालय अहिल्यानगर  येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील अविष्कार स्पर्धेमध्ये आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी. फार्मसी, बोधेगाव (शेवगाव) या महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी  विविध संशोधन स्तरांमधून प्रकल्प सादर करून उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांची विद्यापीठ स्तरावरील फेरीसाठी निवड झाल्याचा अभिमान आहे. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नावीन्यपूर्णता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये आधुनिक फार्मसी, आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण कल्पनांचे सुंदर दर्शन घडले.विद्यार्थ्यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण विश्लेषण व सादरीकरणामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आता विद्यापीठस्तरावर आपली कामगिरी सादर करण्याची संधी मिळणार आहे.या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळाली असून, नाविन्यपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे.अशी माहिती महाविद्यालयाची आदरणीय प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे सर यांनी दिली.महाविद्यालयातील कु. गल्हाट विशाखा , गाडे अभिषेक व प्रतीक्षा गर्जे यांची मेडिसिन अँड फार्मसी विभाग तसेच कु. आव्हाड मोहिनी, औटे सत्यम व देशमुख चेतन यांची इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागमधून या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावरील अविष्कार स्पर्धा साठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनातील सृजनशीलता आणि प्रामाणिक परिश्रमामुळे महाविद्यालयाचा सन्मान वाढला आहे. त्यांच्या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य व मार्गदर्शक प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संशोधन समितीचे मोलाचे योगदान आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या संशोधन समितीचे प्रमुख प्रा. सोमनाथ डावखर यांनी दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी परिवाराकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी डॉ.विद्यारधर काकडे साहेब, मा. जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण बीटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे, कॅम्पस डायरेक्टर भाग्यश्रीताई पाटील यांनी प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे  सर व सर्व  प्राध्यापक तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांची कौतुक केले.

COMMENTS