Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण प्रांताधिकार्‍यांना धक्काबुक्कीसह जीवे मारण्याची धमकी; महसूल कर्मचार्‍यांकडून काम बंद आंदोलन

फलटण / प्रतिनिधी: फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी वाळूचा ट्रक पकडला म्हणून फलटणमध्ये एका वाळू माफियांकडून धक्काबुक्की व

शाळाबाह्य मुलांना सहल घडवत इस्लामपूरमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा
सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून खून; नराधमाला अटक
लोणंद येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस

फलटण / प्रतिनिधी: फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी वाळूचा ट्रक पकडला म्हणून फलटणमध्ये एका वाळू माफियांकडून धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ फलटण तालुक्यातील महसूल कर्मचारी व इतर संघटना यांनी आज लेखणी बंद आंदोलन पुकारून फलटणचे तहसीलदार समीर यादव यांना निवेदन दिले.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांताधिकारी शिवाजी नवनाथ जगताप हे दि. 16 डिसेंबर रोजी कृत्रिम अवयव निर्मिती निगम या कार्यक्रमाचे मीटिंग आटोपून 7 ते 7.15 वाजण्याच्या दरम्यान शासकीय वाहनाने तहसीलदार, तलाठी यांच्यासमवेत सजाई गार्डन येथून बाहेर पडताना एक हायवा ट्रक जाधवाडीकडून फलटणकडे जाताना दिसला. यावेळी त्या वाहनचालक याच्याकडे कागदपत्र नसल्याने वाळूचा व वाहनाचा पंचनामा जप्ती पंचनामा करून गाडी ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनकडे येत असताना गिरवी नाका येथे एकजण गाडीसमोर आडवा येऊन तलाठी धेंडे यांना म्हणत होता की माझी गाडी मी घेऊन जाणार आहे. त्यावेळी त्यास स्वतः प्रांताधिकार्‍यांनी गाडीत वाळू असून त्यास परवाना नाही. गाडी पोलीस स्टेशनला घेऊन निघालो आहे. त्यास नाव विचारले असता त्याने कैलास ननावरे असे सांगून प्रांताधिकारी यांच्या अंगावर धावून आला. मी तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून प्रांताधिकारी यांना धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी देऊन प्रांताधिकारी करत असलेले शासकीय काम करून न देता शासकीय कामात अडथळा आणला. म्हणून प्रांताधिकारी शिवाजी नवनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास महादेव ननावरे (वय 44 वर्षे, रा. मंगळवार पेठ झिरपे गल्ली फलटण) यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS