Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यक्ती मरते पण विचार कायम जिवंत असतात ः प्रा. किसन चव्हाण

वामनभाऊ विद्यालयाच्या वतीने दाभोळकरांची पुस्तके करणार घरोघरी वाटप

शेवगाव तालुका ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व  संत वामनभाऊ विद्यालय वडूले खुर्द तालुका शेवगाव यांचे संयुक्त विद्यमाने डॉ नरेंद्र दाभोळकर

रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठेचा जामिनासाठी अर्ज l LokNews24
ऑक्सिजन संपल्याने डॉक्टर हतबल ; खासगी रुग्णालये व्हेंटिलेटरवर
थोरात व कोल्हे समर्थकांनी घेतली खा. शरद पवारांची भेट

शेवगाव तालुका ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व  संत वामनभाऊ विद्यालय वडूले खुर्द तालुका शेवगाव यांचे संयुक्त विद्यमाने डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त पुस्तके वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.केवळ रस्त्यावर उतरून परीवर्तन घडणारं नाही,हे ओळखून डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी समाजाला विवेकाच्या मार्गांवरून घेऊन जाण्यासाठी त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जी पुस्तके लिहिली ,त्याच विचारांची प्रेरणा घेऊन त्यांचे विचार पूस्तक रूपाने घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.यातून नवीं पिढी विज्ञाननिष्ठ घडविण्यासाठी या पुस्तकाचे वितरण आम्ही करत आहोत.असे आवाहन अंनिस चे कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी केले. यावेळी त्यांनी चमत्कारांचे प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना मंत्र मुग्ध केलें. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा किसनराव चव्हाण हे होते ते म्हणाले डॉ नरेंद्र दाभोलकरांनी भारतीयांना विज्ञानवादी बनवलं त्यांनी कधीही समाजाच्या श्रद्धेला ठेच पोहचवली नाही परंतु अंधश्रद्धा जुनाट चालीरीती कर्मकांड अनिष्ट प्रथा यांच्या विरोधात अनिसच्या माध्यमातून प्रबोधनकरून समजाजागृती केली पण काही सनातनी विचाराच्या नराधमांनी त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली डॉ दाभोळकर शरीराने जरी आपल्यात आज नसले तरी विचाराने ते कायम जिवंत राहतील माणूस मारता येऊ शकतो पण विचार वर्षानुवर्षे जिवंत राहतो असेही प्रा चव्हाण म्हणाले.  विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जगतमित्र अभिजित दगडखैर ,विक्रम फुंदे, अरूण बोरूडे , शैलजा सोनवणे, महादेव मगरे, गणेश वाणी,अमर घुले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब मोरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुसे बाळासाहेब यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापूराव भूसारी, श्रीधर डोळस, ज्ञानेश्‍वर भिटे आदींनी विशेष प्रयत्न केले.आभार संजय डमाळ यांनी मानले.

COMMENTS