संगमनेर ः विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवाकडे वाटचाल करणार्या संगमनेर तालुक्यात सर्वाधिक चारचाकी

संगमनेर ः विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवाकडे वाटचाल करणार्या संगमनेर तालुक्यात सर्वाधिक चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या असून नागरिकांच्या सोयीकरता संगमनेर मध्ये स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे याकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये कायमस्वरूपी शिबीर कार्यालय मंजूर केले असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
आरटीओ शिबिर कार्यालयाबाबत माहिती देताना आ.सत्यजित तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात शेती, सहकार ,शिक्षण, व्यापार यामुळे आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. याचबरोबर घरोघरी दुचाकी व चार चाकी वाहनांची मोठी संख्या आहे. किंबहुना राज्यामध्ये सर्वाधिक टू व्हीलर असलेला तालुका म्हणून संगमनेरची ओळख आहे. वाहन व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या तालुक्याकरता स्वतंत्र प्रादेशिक आरटीओ कार्यालय व्हावे आमदार बाळासाहेब थोरात यांची मोठी इच्छा होती याकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी या ऑफिस च्या मागणीसाठी मुख्यमंत्री नामदार शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला असून आता नवीन आरटीओ ऑफिस हे फक्त जिल्हा स्तरावर मंजूर होत असल्याने यातून मार्ग काढत संगमनेर करता कायमस्वरूपी शिबीर कार्यालय मंजूर केले आहे. विविध वाहनांची पासिंग, त्याचप्रमाणे लर्निंग लायसन, परमनंट लायसन याकरता नागरिकांना श्रीरामपूरला जावे लागत होते . त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता या नवीन शिबिर कार्यालयामुळे ही सर्व कामे संगमनेरातच होणार असल्याने आता नागरिकांची मोठी सोय होणार आहे. हे कार्यालय जुने पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सुरू होणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले असून. या नवीन मंजूर झालेल्या शिबिर कार्यालयामुळे संगमनेर तालुक्यातील नागरिक व तरुण वर्गामध्ये मोठा आनंद निर्माण झाला आहे
COMMENTS