Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनता अशा शक्तींना उलथवून टाकेन ः शरद पवार

राष्ट्रवादी मजबूत करून चित्र बदलणार

सातारा/प्रतिनिधी ः देशात सध्या लोकशाहीला धक्का देवू पाहणार्‍या अपप्रवृत्तींकडून देशभर जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात संघर्ष कसा होईल, याचा प्रयत्न ह

अजित पवार गटावर कारवाई करा
राज्यपाल कोश्यारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या – शरद पवार
मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी… मुख्यमंत्री ठाकरे – शरद पवारांची बैठक

सातारा/प्रतिनिधी ः देशात सध्या लोकशाहीला धक्का देवू पाहणार्‍या अपप्रवृत्तींकडून देशभर जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात संघर्ष कसा होईल, याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक राज्यामध्येफोडाफोडीचे राजकारण सुरु असून, त्याला काही लोक बळी पडले आहेत, मात्र जनताच अशा शक्तींना उलथवून टाकेल असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी केला.

ज्यांच्याविरोधात आमचा संघर्ष त्यांच्यासोबतच आमचे सहकारी गेले. पण नव्यपिढीला आम्ही नाऊमेद होऊ देणार नाही. राष्ट्रवादी मजबूत करायला पुन्हा एकदा उभे राहणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचे चित्र पाटलणार आहे. नवीन पिढीने जोमाने काम करावे म्हणून हा दौरा सुरू केला. तरुणांना दिशा दिली आणि कार्यक्रम दिला तर दोन तीन महिन्यांत राष्ट्रवादी मजबूत होईल असा विश्‍वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सातार्‍यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. त्यापूर्वी शरद पवार यांनी कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले. या माध्यमातून पुढील लढाईचे रणशिंग शरद पवार फुंकले. शरद पवार यांच्यासोबत कोल्हापूरचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. या ठिकाणी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
तसेच भाजपकडून धार्मिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. कराडमध्ये आज नव्या मोहिमेची सुरुवात केली. राष्ट्रवादी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली. मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी केलेले आरोप हे वास्तववादी आहे. त्यांनी केलं ते चांगले नाही. पण मी राजकारण करणार नाही. फडणवीस यांनाच विचारा की तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीसोबत कसं सरकार तयार केले, असे पवारांनी सांगितले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केलेल्या आमदारांबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल शरद पवारांनी सांगितले की, जयंत पाटलांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा अधिकार आहे. जयंत पाटील यांना कारवाईचा अधिकार आहे, त्यांनी निर्णय विचारपूर्वक घेतला असेल. ते खूपच शिस्तबद्ध आहेत आणि ते कायद्यानुसारच काम करतात.’ तसेच, ’1988 मध्येही हिच परिस्थिती निर्माण झाली होती. 3-4 सोडले तर बाकी सर्वजण पराभूत झाले होते, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

आज सकाळी गाडीत बसल्यापासून इथे येई पर्यंत, ठिकठिकाणी कार्यकर्ते त्यात 70 ते 80 टक्के तरुण माझ्या स्वागताला आले होते. आम्ही सर्वांनी कष्ठ केले, या लोकांना योग्य दिशा दाखवली तर मला खात्री की सर्व राज्यातील चित्र राष्ट्रवादीला अनुकूल करण्याच्या दृष्ट्रीने दिसून येईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. आज गुरुपोर्णिमेचा दिवस आहे, आणि आजच्या दिवशी एखादी मोहिम सुरू करायची असेल आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी याची सुरूवात केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा विश्‍वास शरद पवार यांनी व्यक्त केली. काल अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या अनेकांनी मला फोन केले, पण त्यांच्याबाबत सांगणार नाही. योग्य वेळी, ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील. काल तेथे गेले म्हणजे चूकीचे काम केले असे नाही, असेही पवार म्हणाले.

शिवनेरी ते रायगड करणार झंझावाती दौरा – शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शिवनेरी रायगड असा त्यांचा दौरा असेल. यात पहिली सभा वळसे पाटील यांच्या मतदार संघात तर दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात होणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियाच्यामाध्यातून माहिती दिली आहे. सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणे, ही अपेक्षा आमच्या सर्व सहकार्यांकडून आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. नव्या पीढीचा कार्यकर्ता नाउमेद होवू नये, या अपेक्षेने मी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.

COMMENTS