मिंधे गटातील लोक भाजप ने लिहुन दिलेली स्क्रिप्ट वाचुन बोलतात – संजय राऊत 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिंधे गटातील लोक भाजप ने लिहुन दिलेली स्क्रिप्ट वाचुन बोलतात – संजय राऊत 

मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन त्यांच्या यात्रेमध्ये भाजपचे भाडोत्री लोक फिरत होते.  त्यांना धनुष्यबाण पेलवणार आहे का ? हा प्रश्न काल

..तर मग, मुख्यमंत्री व मंत्र्यांचे मानधन बंद करा…
लाल महालात चित्रीकरण करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करा : खा. उदयनराजे
‘दाना’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले

मुंबई प्रतिनिधी – शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन त्यांच्या यात्रेमध्ये भाजपचे भाडोत्री लोक फिरत होते.  त्यांना धनुष्यबाण पेलवणार आहे का ? हा प्रश्न काल उद्धव ठाकरे यांनी विचारला. काल कोकणात अति विराट अशी सभा होती. या सभेनंतर अनेकांचे बोल बिघडले. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव जरी चोरलं असलं तरी लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. ही खोक्याने विकत घेतलेली जनता नाही. कालच्या सभेनंतर महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला आहे. कोकण आणि शिवसेनेत अतूट नातं आहे हे स्पष्ट दिसलं. आता मालेगावला उत्तर महाराष्ट्रात सभा होईल. शिवसेना ही निवडणूक आयोगाच्या बापाची नाही आहे.  जी उचलावी आणि कोणाला द्यावी ही जनतेची आहे. ते काय म्हणता त्याला उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही त्यांचं स्क्रिप्ट भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेला आहे आणि भाजपच्या स्क्रिप्टनुसार मिंधे गटाचे लोक बोलतात. आम्ही अजिबात शिमगा करत नाही जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. देशातल्या 9 प्रमुख विरोधी पक्षांचे नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलं आहे देशाची परिस्थिती नेमकी काय आहे ? सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. ही काही लोकशाही नाही ही तानाशाही आहेआमचे काम आहे जनतेसमोर आणि पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडणं. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे. 

COMMENTS