Homeताज्या बातम्यासंपादकीय

तापमानवाढीचा उच्चांक

खरंतर तापमानवाढ मानवी जगण्याशी संबंधित असलेली अतिशय महत्वाची घटना. तापमानवाढ अशीच होत राहिल्यास मानवी आयुष्य या तापमानवाढीमुळे संपेल की काय अशी भ

राजकारणात आणखी एक गांधी
भ्रष्ट मनोर्‍याचे 16 बळी
सत्ताधारी आणि विरोधकांची ‘दिशा’  

खरंतर तापमानवाढ मानवी जगण्याशी संबंधित असलेली अतिशय महत्वाची घटना. तापमानवाढ अशीच होत राहिल्यास मानवी आयुष्य या तापमानवाढीमुळे संपेल की काय अशी भीती देखील निर्माण होतांना दिसून येत आहे. तरीदेखील या तापमानवाढीकडे कोणतेच सरकार गांभीर्याने घेतांना दिसून येत नाही. जागतिक हवामान परिषदेमध्ये काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न होत असला तरी, तो तोकडा असल्याचे दिसून येत आहे. मानवी जीवन सुसह्य जगण्यासाठी आपण नैसर्गीक साधनसंपत्तींचा र्‍हास करत सुटलो आहे. लोकसंख्या वाढत चालली आहे, त्यामुळे जंगले तोडत आपण मानवी वस्ती करत सुटलो आहे, परिणामी आज सगळीकडे सिंमेटंची जंगले दिसून येत आहे. भारतासारख्या देशाचा क्षेत्रफळाचा विचार करता किमान 33 टक्के क्षेत्र वनाने व्यापलेले हवे, मात्र वने ओसाड पडतांना दिसून येत आहे. त्यामुुळे मानवी जीवन तापमानवाढीच्या चक्रात अडकतांना दिसून येत आहे. आजही एसी, पंखे आणि कुलरच्या थंड छायेत वावरणार्‍यांना तापमानवाढीचा फटका अजूनही बसत नाही, किंवा त्यांना त्याची जाणीव होत नाही. कारण त्यांचे जगणेच कृत्रिम झाले आहे. तापमानवाढीमुळे निसर्गाचा र्‍हास होतांना दिसून येत आहे. देशातील 13 पेक्षा अधिक शहरांमध्ये तापमान 45 पेक्षा अधिक नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जळगाव आणि भुसावळमध्ये तापमान 47 नोंदवण्यात आले असून, राजस्थानमध्ये 50 अंशांच्या जवळपास तापमान नोंदवण्यात आले आहे. राजस्थानमधील फलोदी हे सलग दुसर्‍या दिवशी 49.8 अंशांसह देशातील सर्वात उष्ण शहर राहिले. ते सरासरीपेक्षा 6.8 अंश जास्त होते.

एक दिवस आधी शनिवारी दिवसाचे तापमान 50 अंशांवर गेले होते. रविवारी संपूर्ण राजस्थानमध्ये तापमान 43 अंशांपेक्षा जास्त राहिले. बाडमेरमध्ये 49 अंश होते. येत्या 48 तासांत बिकानेर, जयपूर, भरतपूर आणि कोटा विभागात तापमानाचा पारा 2 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खरंतर तापमानवाढ ही जागतिक समस्या असून, या तापमवाढीसाठी आता भारतानेच पुढाकार घेवून जगाला सुरक्षित करण्याची गरज आहे. जर आगामी काही वर्षांमध्ये अशीच तापमानवाढ होत राहिली, तर मानवी जीवन जगणे अवघड होवू जाईल, त्यामुळे सर्वप्रथम जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षांची लागवड करण्याची खरी गरज आहे. पृथ्वीवर, जिल्ह्यात, गावांमध्ये, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे अत्यावश्यक बनले आहे. वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर केल्यास पृथ्वीचे तापमान कमी करणे शक्य होणार आहे. गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. 1906च्या तुलनेत 25 टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत. यासोबतच हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे 24 तास हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. 1953 ते इ.स. 2003 या 50 वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. 1970 च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान 10 से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या 30 वर्षांत म्हणजे इ.स. 1975-76 पासून 1.5 से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथले हिमाच्छादन दरवषीर् 20 सें.मी.चा थर टाकून देत आहे, अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे वेळीच तापमानवाढ रोखण्यासाठी पावले उचलण्याची खरी गरज आहे. तरच मानवाच्या पुढील पिढ्या सुखी आयुष्य जगू शकतील. 

COMMENTS